निऱ्हाळे विद्यालयात चिमणी दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 07:07 PM2021-03-21T19:07:56+5:302021-03-21T19:08:42+5:30
निऱ्हाळे : येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलांनी व शिक्षकांनी चिमण्यांना तसेच पशू-पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडी तयार करून झाडांवर लावण्यात आली.
निऱ्हाळे : येथील माध्यमिक विद्यालयात जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुलांनी व शिक्षकांनी चिमण्यांना तसेच पशू-पक्षांना पाणी पिण्यासाठी भांडी तयार करून झाडांवर लावण्यात आली.
दिवसेंदिवस चिमण्यांचे प्रमाण कमी होत आहे. पशू-पक्षी, प्राणी यांचे प्रमाण कमी होत आहे. जर हे प्रमाण असेच घटत राहिले तर मनुष्य जीवनालासुद्धा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो, कारण निसर्गातील सर्वच घटक मानवी जीवनाशी संबंधित व सहयोगी आहेत. त्यांचे पालन-पोषण करणे ही मानवाची जबाबदारी आहे. प्रचंड उन्हाळा चालू झाला आहे.
पक्षी पाण्यावाचून तडफडून मरत आहेत. त्यांच्यासाठी एका वाटीत पाणी ठेवू या, नाही तर भविष्यामध्ये चिमणी आणि कावळे चित्रामध्ये मुलांना दाखवावे लागतील. म्हणूनच निऱ्हाळे शाळेच्या वतीने मुलांमध्ये पशू-पक्ष्यांविषयी प्रेम निर्माण व्हावे म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी साहेबराव कुटे, देविदास गर्जे, आर.के. शेळके, राजाराम आव्हाड, विलास शेळके, जितेंद्र पाटील, सरवार किशोर, शैला मंडलिक, सुनीता गीते आदी उपस्थित होते. (२१ निऱ्हाळे १)