निऱ्हाळे विद्यालयात चिमणी दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:34+5:302021-03-24T04:13:34+5:30
------------------------ कांद्याच्या दरात घसरण सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात सोमवारी बारा हजार क्विंटलची आवक झाली होती. लाल कांद्यास ...
------------------------
कांद्याच्या दरात घसरण
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात सोमवारी बारा हजार क्विंटलची आवक झाली होती. लाल कांद्यास सरासरी १००० हजार रुपये, तर गावठी कांद्यास ११०० रुपये भाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून कांदा दरात सातत्याने घसरण होत आहे.
------------------
दुचाकीवरून केले भारत दर्शन
सिन्नर : तालुक्यातील मेंढी येथील नवोदय निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष मधुकर गिते यांनी सपत्नीक सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास दुचाकीवरून करत भारत दर्शन यात्रा पूर्ण केली.
-------------------
दोडी रुग्णालयास रुग्णवाहिका भेट
नांदूरशिंगोटे : तालुक्यातील दोडी येथील ग्रामीण रुग्णालयास माळेगाव येथील केएसबी पंप्स कारखान्याकडून सामाजिक बांधिलकी जपत अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट देण्यात आली.
-----------------------
गरिबांचा फ्रीज कोरोनामुळे संकटात
सिन्नर : गरिबांचा फ्रीज अशी ओळख असणारा मातीपासून बनवलेला पाण्याचा माठ सध्या कोरोना महामारीमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
----------------------
औषध विक्रेत्यांना लस देण्याची मागणी
सिन्नर : शहर व तालुक्यातील सर्व केमिस्ट (औषधविक्रेते) फार्मासिस्ट व कर्मचारी यांना शासनाने प्राध्यानक्रमाने लस द्यावी, अशा आशयाचे निवेदन तालुका केमिस्ट सोशल ग्रुपतर्फे उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांना देण्यात आले.
-------------------
दीपक श्रीमाली यांची निवड
सिन्नर : येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. दीपककुमार श्रीमाली यांची अन्याय अत्याचार निमूर्लन समिती या सामाजिक संघटनेच्या सोशल मीडिया तालुकाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. समितीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष संदीप भालेराव यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष संजय भोजने, अॅड. समता श्रीमाली आदी उपस्थित होते.