पिंपळगाव बसवंतला चिमुरड्याची हत्या

By Admin | Published: June 27, 2017 01:17 AM2017-06-27T01:17:20+5:302017-06-27T01:17:32+5:30

पिंपळगाव बसवंत : पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला घरी नेऊन लैंगिक शोषण करून जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली.

Chimudara assassination in Pimpalgaon Basant | पिंपळगाव बसवंतला चिमुरड्याची हत्या

पिंपळगाव बसवंतला चिमुरड्याची हत्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगाव बसवंत : पाच वर्षांच्या चिमुरड्याला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याला घरी नेऊन लैंगिक शोषण करून जिवे ठार मारल्याची घटना येथील इस्लामपुरा परिसरात घडली. रमजान ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या अमानुष प्रकारामुळे इस्लामपुरा भागात सोमवारी ईद साजरी झाली नाही. याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार संशयिताना अटक करण्यात आली आहे. पिंपळगाव बसवंत येथील इस्लामपुरा परिसरात लुकमान गनी पिंजारी हे आपले पत्नी, तीन मुली व मुलासह राहतात. रविवारी (दि. २५) रात्री ८ वाजेच्या सुमारास पिंजारी यांचा मुलगा साहिल ऊर्फ दादू लुकमान पिंजारी (५) हा अचानक गायब झाला.  परिसरात शोध घेऊनही साहिल न सापडल्याने याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांना माहिती देण्यात आली. साहिलचा शोध घेण्यासाठी शंभर ते दीडशे जणांनी इस्लामपुऱ्यातील सुमारे साडेतीनशे घरांची तपासणी केली. मात्र साहिल सापडला नाही.  लुकमान पिंजारी यांच्या घराजवळच भिकन निजर पिंजारी हा त्यांचा जवळचा नातेवाईक राहतो रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याच्या घराला बाहेरून कुलुप लावून अमिना नजीर पिंजारी ही महिला घराबाहेर बसलेली आढळून आली. काही नागरीक या घराची झडती घेण्यासाठी गेले अमिना पिंजारी हिने त्यांना अटकाव केला मात्र नागरिकांनी विरोध झुगारून घर ऊघडले. घरात पलंगावर गादी गोळा केलेली दिसली मात्र गादीच्या बाहेर लहान मुलाचे पाय दिसले. नागरीकांनी गादी उलगडून पाहिली असता त्यात साहिलचा मृतदेह सापडला. रात्री साडेअकरा वाजता त्यास सरकारी दवाखान्यात दाखल केले मात्र डॉक्टरानी त्यास मृत घोषित केले . रात्री दीड वाजता येथील नागरिकांनी संशयित भिकन पिंजारी याला शोधले. त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री आठ वाजता साहिल यास चॉकलेटचे आमिष दाखवून घरी नेले व कोंडून ठेवले. लैंगिक शोषण करण्याच्या हेतूने त्याचे तोंड दाबून जिवे ठार मारल्याची कबुली संशयित भिकन निजर पिंजारी याने पोलीसांना दिली. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भिकन निजर पिंजारी, आमिनाबी निजर पिंजारी, शकीला इब्राहिम पिंजारी, नसरीन सादिक पिंजारी यांना अटक केली आहे.
चौकट
लुकमान गनी पिंजारी यांच्या कुटुंबात तीन मुलींच्या जन्मानंतर साहिलचा जन्म झाला. नवसाने झालेल्या साहिलसाठी लुकमान पिंजारी हे गेली पाच वर्षे भीक मागून कपडे अन्य साहित्य घेत होते. सोमवारी असलेल्या रमजान इदसाठी साहिलला वडिलांनी प्रथमच नवीन कपडे घेतले होते. व बुट घेण्यासाठी दुकानात गेले असताना साहिल यास संशयित भिकन घरी घेऊन गेला. या पूर्वीही भिकन याने हुजेब रज्जाक पिंजारी, लौकिफ जावेद पिंजारी या दोन बालकांना अमिष दाखवून घरी नेण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो अयशस्वी झाला होता .  सदरच्या प्रकाराने इस्लामपूरा भागात ईद साजरी झाली नाही. अत्यतं शोकाकुल वातावरणात साहिल याचा दफनविधी करण्यात आला. ज्या घरात सदरची घटना घडली त्या घरात भानामती चालत असल्याची चर्चा रहिवाशांमध्ये असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
प्रथमच घेतले होते नवीन कपडे
लुकमान पिंजारी यांच्या कुटुंबात तीन मुलींच्या जन्मानंतर साहिलचा जन्म झाला. नवसाने झालेल्या साहिलसाठी पिंजारी हे गेली पाच वर्षे भीक मागून कपडे, अन्य साहित्य घेत होते. सोमवारी असलेल्या ईदसाठी साहिलला वडिलांनी प्रथमच नवीन कपडे घेतले होते व बुट घेण्यासाठी दुकानात गेले असताना साहिल यास संशयित भिकन घरी घेऊन गेला. यापूर्वीही भिकन याने हुजेब रज्जाक पिंजारी, लौकिफ जावेद पिंजारी या दोन बालकांना आमिष दाखवून घरी नेण्याचा प्रयत्न केला होता.
सदर प्रकाराने इस्लामपुरा भागात ईद साजरी झाली नाही. अत्यंत शोकाकुल वातावरणात साहिल याचा दफनविधी करण्यात आला. ज्या घरात सदरची घटना घडली त्या घरात भानामती चालत असल्याची चचा रहिवाशांमध्ये असून, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Web Title: Chimudara assassination in Pimpalgaon Basant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.