सिडकोत मोकाट जनावरांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 05:12 PM2019-01-04T17:12:02+5:302019-01-04T17:13:16+5:30
नाशिक : मोकाट जनावरांनी केलेल्या हल्ल्यात सात वर्षीय शाळकरी चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि़४) सकाळी सिडकोतील साईबाबानगरमध्ये घडली़ महेश पवार (७, रा. साईबाबानगर, सिडको, नाशिक) असे गंभीर जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. जखमी महेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे़ दरम्यान, या परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी सात वाजेच्या सुमारास महेश आपल्या आईसोबत जात होत़ यावेळी साईबाबानगरमधील रस्त्यावर उभ्या असलेल्या मोकाट जनावरांपैकी एकाने जनावराने महेश यास शिंगावर उचलून घेत जमिनीवर आदळले़ यामध्ये महेशचे डोके, छाती व पोटाला गंभीर दुखापत झाली आहे़ या मोकाट जनावरांच्या तावडीतून सुटका करीत महेशला त्याच्या आईने नागरिकांच्या मदतीने जवळील रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़
या परिसरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन परिसरातील रहिवाशांनी ४ डिसेंबर रोजी महापालिका प्रशासनास दिले होते़ मात्र, याची दखल न घेतल्याने ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ दरम्यान, सिडको व पंचवटी, तसेच शहरातील विविध भागांत असलेल्या मोकाट जनावरांचा महापालिकेने तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
डोक्यास गंभीर स्वरुपाचा मार
मोकाट जनावरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेशला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्याच्या डोक्यास गंभीर स्वरुपाचा मार लागला असून ७२ तास त्यास परिक्षणाखाली ठेवावे लागणार आहे़
डॉ़ वैभव महाले, संचालक कल्पतरू हॉस्पिटल़ नाशिक़