बालअभिनयासाठी मिळालेले ५१ हजारांचे मानधन चिमुकलीने ‘खाकी’ला भेट देत साजरा केला ‘बर्थ-डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:41 PM2020-08-06T15:41:58+5:302020-08-06T15:42:24+5:30

शहरात राहणा-या सौख्या अमित कुलकर्णी (१०) हिचा बुधवारी (दि.५) वाढदिवस होता. तिने आपल्या मोठ्या दिदीसोबत चित्रपटांत काम केल्याने मिळालेले ५१ हजारांचे मानधन पोलीसांच्या कल्याण निधीसाठी

Chimukali celebrates 'Birthday' by visiting 'Khaki' | बालअभिनयासाठी मिळालेले ५१ हजारांचे मानधन चिमुकलीने ‘खाकी’ला भेट देत साजरा केला ‘बर्थ-डे’

बालअभिनयासाठी मिळालेले ५१ हजारांचे मानधन चिमुकलीने ‘खाकी’ला भेट देत साजरा केला ‘बर्थ-डे’

Next
ठळक मुद्दे कौतुकास्पद असल्याचे नांगरे पाटील म्हणाले

नाशिक : रात्रंदिवस ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चे ब्रीद घेऊन समाजाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर असणाऱ्या ‘खाकी’करिता शहरातील दोघा शाळकरी मुलींनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत चित्रपटात काम करत मिळालेले ५१ हजारांचे मानधन थेट शहर पोलीस आयुक्तालयाच्या कल्याणनिधीसाठी भेट म्हणून दिली. पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी धनादेशाचा स्विकार करत इतक्या लहान वयात सौख्या व सौम्या कुलकर्णी या दोघी बहिणींनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
शहरात राहणा-या सौख्या अमित कुलकर्णी (१०) हिचा बुधवारी (दि.५) वाढदिवस होता. तिने आपल्या मोठ्या दिदीसोबत चित्रपटांत काम केल्याने मिळालेले ५१ हजारांचे मानधन पोलीसांच्या कल्याण निधीसाठी देत सामाजिक भान जपत इतरांनाही प्रेरणा दिली. सौख्याने आपला वाढदिवस खाकीतील हिरो कोरोना योध्दा यांना मदत करून साजरा करण्याचे ठरविले. तिने हा मानस तिच्या पालकांकडे व्यक्त केला. पालकांनीही होकार देत सौख्या व सौम्या या दोघी बहिणींनी चित्रपटात काम केल्यामुळे त्यांना मिळालेली मानधनाच्या रकमेचा धनादेश नांगरे पाटील यांची आयुक्तालयात भेट घेऊन प्रदान केला. या दोघींनी इतक्या कमी वयात दाखविलेले दातृत्व आणि जपलेले सामाजिक भान हे भावी पिढीच्या चांगल्या भवितव्याचे द्योतक आहे. या दोघींनी त्यांना मिळालेले मानधन पोलिसांच्या कल्याणासाठी देऊ केले हे अत्यंत कौतुकास्पद असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.
कोरोनाचे संकट देशावर आले असताना आपले पोलीस त्यांच्या जीवाची पर्वा न करता लोकांसाठी रस्त्यांवर उतरत आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे मी मागील चार महिन्यांपासून बघत आहेत. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की यंदाचा वाढदिवस आपण ‘पोलीस काका’सोबत त्यांच्यासाठी काहीतरी करत साजरा करायचा, म्हणून दीदीसोबत चित्रपटात केलेल्या कामातून मिळालेली मानधनाची रक्कम भेट म्हणून दिल्याचे सौख्याने सांगितले.

Web Title: Chimukali celebrates 'Birthday' by visiting 'Khaki'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.