जिल्हा रुग्णालयातून चिमुकलीला केले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:27+5:302021-02-14T04:14:27+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयात अंबड गावातील एका परप्रांतीय गौड कुटुंबातील दोन महिला शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आल्या. कागदपत्रांची पूर्तता ...

Chimukali disappeared from the district hospital | जिल्हा रुग्णालयातून चिमुकलीला केले गायब

जिल्हा रुग्णालयातून चिमुकलीला केले गायब

Next

जिल्हा शासकीय रुग्णालयात अंबड गावातील एका परप्रांतीय गौड कुटुंबातील दोन महिला शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आल्या. कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गर्भवती मनीषा गौड यांना घेऊन त्यांची दुसरी बहीण (अपहृत मुलीची आई) पहिल्या मजल्यावरील प्रसूती कक्षाजवळ आली. यावेळी तिने कक्षाबाहेर असलेल्या बाकावर आपल्या तान्हुलीला हातातील पिशवी अंथरवून झोपविले आणि तिच्या बहिणीला तपासणीसाठी कक्षात घेऊन गेली. काही वेळेत ती पुन्हा कक्षाबाहेर आली असता तेथील बाकावर झोपविलेली चिमुकली नजरेस पडली नाही. त्या मातेने संपूर्ण मजल्यावर भटकंती करत शोधाशोध केली. तसेच कक्षाबाहेर असलेल्या महिला सुरक्षारक्षकाच्याही ही बाब लक्षात आणून दिली आणि तत्काळ मजल्यावरून खाली धाव घेत रुग्णालयाबाहेरील आवारात शोध घेण्यास सुरुवात केली. कोठेही चिमुकली आढळून न आल्यामुळे तिने रडारड सुरू केली. यावेळी रुग्णालयीन व्यवस्थापनाला जेव्हा ही बाब समजली तेव्हा त्यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली असता पाऊण वाजेच्या सुमारास एक अज्ञात पुरुष खांद्यावर चिमुकलीला घेऊन बाहेर पडत असल्याचे दिसून आले. चिमुकलीच्या मातेला हे चित्रीकरण दाखविण्यात आले असता तिने ही आपलीच मुलगी असल्याचे ओळखले; मात्र तिला घेऊन जाणारा पुरुष हा तिचा कोणीही नातेवाईक किंवा ओळखीची व्यक्ती नसल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर तत्काळ नियंत्रण कक्षाला बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती देत शहरात सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गस्तीवरील पथकांना ‘ॲलर्ट’ करण्याच्या सूचना दिल्या.

---इन्फो--

पाहुण्या आलेल्या महिलेने चिमुकलीला गमावले

अंबडमध्ये राहणाऱ्या आपल्या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी महिनाभरापासून ठाणे जिल्ह्यातील राबेला गावातून पाहुण्या आलेल्या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातून आपल्या चिमुकलीला गमवावे लागले. अत्यंत गोरगरीब परिस्थिती असलेल्या या महिलेला दोन मुले आणि एकुलती एक मुलगी आहे. या सव्वा वर्षाच्या चिमुकलीला ज्या अपहरणकर्ता पुरुषाने रुग्णालयातून झोपलेल्या अवस्थेत उचलले तो पुरुष रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षाजवळील मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

---

दिवसभर पोलिसांकडून शहरात शोध

अपहरणकर्त्या पुरुषाचा पोलिसांकडून दिवसभर शोध घेतला जात होता; मात्र कोठेही त्याचा थांगपत्ता लागला नाही. सरकारवाडा पोलिसांचे सर्वच गस्ती पथके, बीट मार्शल, निर्भया पथकांसह अन्य पोलीस ठाण्यांच्या गस्ती पथकांसह गुन्हे शोध पथकांकडून संपूर्ण शहराचा कानाकोपरा पिंजला जात होता; मात्र शनिवारी रात्रीपर्यंत कोठेही अपहरणकर्ता पुरुष आढळून आलेला नव्हता. तत्काळ सर्व बसस्थानके, रेल्वेस्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गोदाकाठही पिंजून काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

----

फोटो आर वर १३सिव्हील /१३सिव्हिल१ /२नावाने सेव्ह आहे.

----

===Photopath===

130221\13nsk_27_13022021_13.jpg~130221\13nsk_28_13022021_13.jpg~130221\13nsk_29_13022021_13.jpg

===Caption===

जिल्हा शासकिय रुग्णालयातुन चिमुकलीचे अपहरण~जिल्हा शासकिय रुग्णालयातुन चिमुकलीचे अपहरण~जिल्हा शासकिय रुग्णालयातुन चिमुकलीचे अपहरण

Web Title: Chimukali disappeared from the district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.