चिमुकल्यांनी जाणून घेतल्या ‘मनातील भावना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:15 AM2021-07-29T04:15:31+5:302021-07-29T04:15:31+5:30
ऑनलाइन झालेल्या ‘मनातील भावना’ या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांनी जीवनात यशस्वी कसे व्हावे याबाबतचे धडे गिरवले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये अपार कार्यक्षमता ...
ऑनलाइन झालेल्या ‘मनातील भावना’ या उपक्रमांतर्गत चिमुकल्यांनी जीवनात यशस्वी कसे व्हावे याबाबतचे धडे गिरवले. शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये अपार कार्यक्षमता असते, हे लक्षात घेऊन शिक्षकांनी दिन विशेषशी संबंधित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वतःसाठी विचार करण्याच्या प्रक्रियेतर्गंत विद्यार्थ्यांना ‘भावना’ या संकल्पनेची ओळख शिक्षिकांनी करून दिली गेली. दैनंदिन जीवन आनंदी, चांगले, क्रोधमय आणि भीती यांसारख्या भावनांनी भरलेले असते हे विद्यार्थ्यांना पाॅवर पॉइंटच्या माध्यमातूून दाखविण्यात आले. त्याचबरोबर क्रोध, उदासीनता यांसारख्या नकारात्मक भावनांचा वेळोवेळी कसा सामना करावा त्यांना कसे सामोरे जावे याची जाणीव करून दिली. तसेच विविध भावनांचे इमोजीदेखील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आल्या. या उपक्रमात विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांमध्ये ‘भावना ’ही संकल्पना राबवण्याच्या या उपक्रमासाठी शिक्षकांचे सहकार्य लाभले.