चोरी गेलेल्या सायकल परत मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर फुलला आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:01 PM2020-06-18T18:01:03+5:302020-06-18T18:03:43+5:30
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला
नाशिक : शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची जोमाने सुरुवात केली आहे. त्यातच परिसरात सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याची घटना वाढत होत्या.
राजीव नगर येथून तीन सायकली चोरीला गेल्याचा तक्रार अर्ज इंदिरानगर पोलीस ठाण्यात सागर घुगे यांनी दिला होता. त्यानुसार पोलिस तपास करत असताना गुन्हे शोधक पथकाचे भगवान शिंदे यांना राजीव नगर झोपडपट्टी येथे सहा चोरीच्या सायकल एका पडक्या घरात ठेवलेल्या असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तिथे छापा टाकून सहा सायकली जप्त करून सायकलीचे मालक पंकज चित्ते , याच्या दोन सायकली एक लहान व एक मोठी रीध्दी घुगे, ईची एक सायकल अशा एकूण तीन सायकली या दोन लहान मुलांना परत केल्या आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या हस्ते या सायकली मुलांच्या स्वाधीन करण्यात आल्या. चोरी गेलेल्या सायकली मिळाल्याने मुलांनी आनंद व्यक्त करत पोलिसांना यावेळी मिठाईचे पाकिट देऊन आभार मानले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतिष जगदाळे , भगवान शिंदे ,दिपक पाटील, राजेश निकम ,रियाज शेख यांच्या पथकाने केली तसेच संशयित आरोपीचा शोध सुरू आहे