चिमुकल्यांनी फेटे बांधून केला गुरु जनांचा सन्मान
By admin | Published: March 9, 2017 01:16 AM2017-03-09T01:16:50+5:302017-03-09T01:17:03+5:30
निफाड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील चिमुकल्यांनी महिला शिक्षकांना फेटे बांधून समानतेचा आगळा-वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
निफाड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील चिमुकल्यांनी महिला शिक्षकांना फेटे बांधून समानतेचा आगळा-वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
येथील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी शाळेतील महिला शिक्षकांचा फेटे बांधून व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. शाळेच्या मुख्याध्यापक अलका जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थिनी नंदिनी गायकवाड, तेजश्री कांदळकर, साक्षी कुशारे, पायल म्हस्के, श्रद्धा पगारे, श्रृती लोखंडे, सिद्धी कुंदे, संस्कृती सूळ, तनुष्का कर्डिले, अज्ञेया भवर, अनुष्का जाधव, श्रावणी
ढेकणे, नेहा म्हैसधुणे, समृद्धी वडघुले यांनी एकपात्री नाटिकेद्वारे इंदिरा गांधी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले आदि थोर समाजसेविका, नेत्या, यांच्या जीवनकार्याची माहिती
विशद केली. गोरख सानप यांनी महिलांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती
दिली.
याप्रसंगी सुजाता तनपुरे, जयश्री शिरसाठ, प्रतिभा खैरनार, कल्पना आहेर, मनिषा चव्हाण, विजया पवार, सुजाता पाटील, सविता रोहम, राजश्री सोनवणे या शिक्षिकांचा व मंगला सोनवणे, वासंती गोसावी, नंदा व्यवहारे, चंद्रकला मगर, हेमलता बागुल या महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा फेटे बांधून व गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव, रामचंद्र सैंद्रे उपस्थित होते. (वार्ताहर)