चिमुकल्यांनी साकारल्या ५०० शाडू मातीच्या गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:44 PM2018-09-03T16:44:17+5:302018-09-03T16:45:15+5:30
सिन्नर येथील शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने शाडू मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचे शिबीर येथील भगवती लॉन्स येथे उत्साहात पार पडले.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण व त्यामूळे होणारे पर्यावरणाचे नुकसान याला आळा बसावा. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशातून होणाऱ्या या उपक्रमात शहर व तालुक्यातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला. याप्रसंगी तब्बल ५०० हुन अधिक बालगोपालांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. अतिशय सुबक व सुंदर अशा मूर्ती यावेळी सर्वांनी बनवून आपण याच गणपतीची प्रतिष्ठा करणार असा संकल्प यावेळी केला. या उपक्रमात वृद्ध, तरूण, महिला, मुली, लहान मुले असे सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते. कृष्णाष्टमीच्या दिवशी शिवसरस्वती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात बाल गोपालांनी केलेली गर्दी लक्षणीय होती. पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाबरोबर मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणे हा देखील यामागील प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी स्मिता मुळाने, संजय दुर्गावाड, गणेश शेकरे यांनी या शिबिरात शाडू माती बनविण्याचे प्रशिक्षण दिले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पंकज जाधव, नगरसेवक सुहास गोजरे, वासंती देशमुख, प्रीती वायचळे, माजी नगरसेवक बापू गोजरे, हर्षद देशमुख, शशीकांत गाडे, सुनील कानडी, किरण खाडे, कृष्णा कासार, प्रशांत सोनवणे, देवा आवारे, स्वप्निल शिरसाठ, महेश पगार, दर्शन कासट, संदीप गोजरे, सावन कासट आदि कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.