वारीदरम्यान अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या सायकलपटूचे अवयवदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 05:49 AM2019-06-29T05:49:45+5:302019-06-29T05:50:07+5:30

नाशिकहून पंढरपूरकडे जाणाऱ्या सायकल वारीत प्रेम सचिन निफाडे (९) हा बालक सहभागी झाला होता.

Chimulya cyclist organisms killed during an accident! | वारीदरम्यान अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या सायकलपटूचे अवयवदान!

वारीदरम्यान अपघातात ठार झालेल्या चिमुकल्या सायकलपटूचे अवयवदान!

googlenewsNext

नाशिक  - नाशिकहून पंढरपूरकडे जाणाऱ्या सायकल वारीत प्रेम सचिन निफाडे (९) हा बालक सहभागी झाला होता. शुक्रवारी सकाळी नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर बायपासजवळ त्याच्या सायकलला पाठीमागून ट्रकने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. पुत्र शोकातून स्वत:ला सावरत प्रेमचे वडील सचिन निफाडे आणि कुटुंबीयांनी मिळून त्याच्या डोळ्यांसह त्वचादान करण्याचा निर्णय घेत समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
२०१२ साली केवळ ११ सायकलपटूंपासून सुरुवात झालेल्या पंढरपूरच्या सायकलवारीला अवघ्या काही वर्षांत चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा या वारीत ७०० सायकलपटू सहभागी झाले आहेत. मात्र, या घटनेमुळे या सायकलवारीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Chimulya cyclist organisms killed during an accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.