स्नेहसंमेलनातून चिमुरड्यांनी जागविली देशभक्ती

By admin | Published: January 31, 2016 11:15 PM2016-01-31T23:15:30+5:302016-01-31T23:20:34+5:30

स्नेहसंमेलनातून चिमुरड्यांनी जागविली देशभक्ती

Chimuradan awakens patriotism from affection | स्नेहसंमेलनातून चिमुरड्यांनी जागविली देशभक्ती

स्नेहसंमेलनातून चिमुरड्यांनी जागविली देशभक्ती

Next

देवळाली कॅम्प : स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वांच्या मनात देशभक्ती जागविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आदर्श शिशुविहार शाळेच्या विद्यार्थ्यांनी केला असल्याचे प्रतिपादन सोमनाथ खातळे यांनी केले.
मविप्रच्या आदर्श शिशुविहार या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खातळे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका आशा गोडसे, चंद्रकांत गोडसे, ज्येष्ठ विधिज्ञ अशोक आडके, शिक्षक-पालक संघाचे रवींद्र डावरे, रूपेश ठोंबरे, रूपाली शिंदे, रमेश नायडू आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रथमच ‘इन्क्रेडिबल इंडिया’ या थीमवर विविध राज्यांची परंपरा दर्शविणारे लोकनृत्य सादर केले. स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे ते नेहरूंपर्यंतच्या राष्ट्रपुरुंषांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे सादरीकरण करून स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना मानवंदना दिली. कलाकारांची वेशभूषा परिधान करीत ‘व्यसनापासून दूर रहा’ असा संदेश देणारे नाटकही सादर केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक मुकुंद सावळे यांनी केले. वार्षिक अहवाल वाचन वैजू धुर्जड यांनी सादर केला. सूत्रसंचालन दिना सिद्दिकी, वैशाली जाधव यांनी, तर आभार धनश्री पवार यांनी मानले.आदर्श शिशुविहार शाळेत आयोजित कार्यक्रमप्रसंगी भारतदर्शन घडविताना विद्यार्थी.

Web Title: Chimuradan awakens patriotism from affection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.