चीनमधील मालाला बंदी, भारताला संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:33 PM2020-02-29T22:33:34+5:302020-02-29T22:37:58+5:30
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी यांबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांना आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे निर्णयाबाबत संभ्रमावस्था कायम आहे. कोरोना व्हायरसमुळे युरोपियन देशांमध्ये चीनच्या कांद्याला बंदी आहे. कांद्याचे उत्पादन लक्षात घेता केंद्राने धोरण जाहीर केले तर भारतीय कांद्याला मागणी वाढून शेतकऱ्यांच्या हाती दोन पैसे येऊ शकतात, अशी अपेक्षा कृषितज्ज्ञ आणि निर्यातदारांमध्ये व्यक्त केली जात आहे.

केंद्र सरकारने गत सप्टेंबर २०१९ पासून कांदा निर्यातबंदी केली होती. साठवणुकीबाबतही निर्बंध लादले होते. पावसाने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून पुन्हा कांद्याची लागवड केली. नवीन कांद्याचे पीक बाजारात आल्यानंतर मात्र भावात घसरण सुरू झाली. मिळणाºया भावातून उत्पादन खर्च फिटनेही अवघड झाल्याने शेतकºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याबाबत ट्विट केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केले. मात्र या निर्णयाबाबत बाजार समित्यांना कोणतेही अध्यादेश प्राप्त झालेले नसल्याने कांदा व्यापारी, निर्यातदार, शेतकरी हे सर्वच संभ्रमावस्थेत आहेत. केंद्र शासनाने योग्यवेळी निर्णय घेऊन ही संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणी होत आहे.