चिंचलेखैरे शाळेला विविध वस्तूंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 04:31 PM2019-02-26T16:31:42+5:302019-02-26T16:31:52+5:30
इगतपुरी : वर्धमान लेडिज ग्रुप लालबाग मुंबई यांचेतर्फे जिल्हा परिषद चिंचलेखैरे शाळेला विविध वस्तु भेट देण्यात आल्या.
इगतपुरी : वर्धमान लेडिज ग्रुप लालबाग मुंबई यांचेतर्फे जिल्हा परिषद चिंचलेखैरे शाळेला विविध वस्तु भेट देण्यात आल्या. शाळेच्या मुलांसाठी ५०० लीटर पाण्याची टाकी भेट दिली.शाळेने सर्व फिटींग करून पाणी सुविधा वापर सुरू केला. १८० मुलांना स्टिलचे ताट, ग्लास, चमचा, पाणी बाटली व साहित्य यांचे वाटप केले. तसेच शाळेला तीन सिलिंग फॅन दिले. मुलांना केक व खाऊ वाटप केला. तसेच चिंचलेखैरे व खैरेवाडी येथील लोकांना घरगुती साहित्य वाटप केले.वर्धमान लेडिज ग्रुपचे अध्यक्ष पिंकी मुथालिया व सचिव संगिता खोटरे व प्रमुख अतिथी केंद्रप्रमुख हिराबाई खतेले उपस्थित होत्या. यावेळी सरपंच, उपसरपंच मंगाजी खडके, मुख्याध्यापक निवृती तळपाडे, उत्तम भवारी, भावराव बांगर, विजय पगारे, प्रकाश सोनवणे, हरिश्चंद्र दाभाडे, प्रशांत वाघ उपस्थित होते. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी शिक्षक हौसीराम भगत, प्रशांत बांबळे, नामदेव धादवड, भाग्यश्री जोशी यांनी परिश्रम घेतले.