चिंचावडला दहा दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 05:46 PM2019-01-30T17:46:33+5:302019-01-30T17:48:23+5:30
चिंचावड : मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
चिंचावड : मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथे दहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असून ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. संबंधितांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
येथे दाभाडीसह बारा गाव योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी दहा दिवसांकरीता ग्रामस्थांना साठा करावा लागतो. यामध्ये प्लास्टीक ड्रम, सिमेंट टाकी, स्टील भांडे यांचा उपयोग करावा लागतो.
गावात पाण्यासाठी पर्यायी योजना म्हणून सातबाई मंदिराजवळील बोर तसेच गावात सहा हातपंप आहेत. यांच्यातील एक हातपंप बंद व सातबाई मंदिराजवळील जलपरी पाणी विना बंद पडली आहे. पाण्याची पातळी स्त्रोत बंद झाला आहे. ज्या दिवशी दहा दिवसाआड पाणी गावात येतो त्या दिवशी महिलांची एकच धावपळ असते. पाणी येण्याच्या दिवशी मजूर वर्ग कामालाही जात नाही. सध्याजरी पाण्याचा तुटवडा काही मात्र अजून ग्रामस्थांना पाच महिन्याच्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पाणी सोडल्यास गिरणा किनारी राहणाऱ्या लोकांचा गुरांचा व पिण्याच्या पाण्याच्या काही महिने का होईना पाणी प्रश्न सुटेल.