चिंचोडीकरांना ठक्करबाप्पा पावला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 12:27 AM2022-02-22T00:27:12+5:302022-02-22T00:28:03+5:30
येवला : तालुक्यातील चिचोंडी खुर्द येथे ठक्करबाप्पा योजनेतून पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांचे झाले. आदिवासी वस्तीवर नळाद्वारे पाणी पोहोचल्याने वस्तीवरील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

सभापती ह्यआपल्या दारीह्ण या उपक्रमांतर्गत सभापती गायकवाड यांच्या हस्ते रेशनकार्डचे वाटपही यावेळी करण्यात आले. शासन सर्वच घटकांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी योजना आखते. या योजनांचा लाभ घेतला, तर स्व विकासाबरोबरच गावविकासही साधला जातो, असे प्रतिपादन यावेळी सभापती गायकवाड यांनी केले. आदिवासी वस्तीवर सोलर हायमास्ट, पिण्याचे पाणी, शौचालय यासह अनेक योजनांचा लाभ यापूर्वी देण्यात आला असल्याची माहिती सरपंच मनीषा मढवई यांनी दिली. कार्यक्रमास साईनाथ मढवई, सिंधूबाई मढवई, सरला मढवई, सारिका मढवई, ताराबाई मढवई, रूपाली मढवई, सुनीता मढवई तसेच ग्रामसेवक बी. बी. गायके, दिगंबर मोरे, एकनाथ मोरे, कानिफनाथ माळी, गुलाब पगारे, संदीप पगारे, रमेश माळी मीराबाई जिरे, वाळूबा मोरे, बालाजी माळी, एकनाथ मोरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.