चिंचोलीत जनसेवा पॅनल विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:34 AM2018-03-01T00:34:45+5:302018-03-01T00:34:45+5:30
सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनसेवा पॅनलचे शांताराम भीमाजी नवाळे यांचा विजय झाला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड एकमधील एका जागेसाठी माजी सरपंच संजय सानप व राजू नवाळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलकडून शांताराम भीमाजी नवाळे व माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गायकवाड यांच्या पॅनलकडून विठ्ठल चंद्रभान लांडगे यांच्यात सरळ लढत झाली. यात नवाळे यांनी लांडगे यांचा ३०४ मतांनी पराभव केला.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत जनसेवा पॅनलचे शांताराम भीमाजी नवाळे यांचा विजय झाला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या वॉर्ड एकमधील एका जागेसाठी माजी सरपंच संजय सानप व राजू नवाळे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनलकडून शांताराम भीमाजी नवाळे व माजी पंचायत समिती सदस्य शांताराम गायकवाड यांच्या पॅनलकडून विठ्ठल चंद्रभान लांडगे यांच्यात सरळ लढत झाली. यात नवाळे यांनी लांडगे यांचा ३०४ मतांनी पराभव केला. मंगळवारी सकाळी सिन्नर तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत ६०२ झालेल्या मतदाना पैकी शांताराम नवाळे यांना ४५० तर विठ्ठल लांडगे यांना १४६ मते पडली तर सहा मते नोटाला पडली. सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकाºयांनी नवाळे यांच्या विजयाची घोषणा करताच चिंचोली येथील समर्थकांनी गावात गुलालाची उधळण करीत आतषबाजी करत एकच जल्लोष केला. यावेळी सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीचे माजी सदस्य उदय सांगळे, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप आदींच्या हस्ते नवाळे यांचा सत्कार करण्यात आला.
गेल्या काही दिवसात आम्ही गावात करत असलेल्या विकासकामांची पावती आजच्या विजयातून ग्रामस्थांनी आम्हाला दिली आहे. सर्वांना बरोबर घेऊन चिंचोलीचा आदर्श गाव बनविण्याचा आमचा मानस आहे.
- संजय सानप,
माजी सरपंच, चिंचोली