मोलमजुरी करणाऱ्यांना चिंचोक्यांनी दिला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 10:12 PM2020-04-09T22:12:03+5:302020-04-09T23:16:12+5:30

सिन्नर : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने उपाययोजना म्हणून देशभरात ‘लॉकडाउन’ पाळले जात आहे. या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात ...

Chinchwakis give relief to the laborers | मोलमजुरी करणाऱ्यांना चिंचोक्यांनी दिला दिलासा

मोलमजुरी करणाऱ्यांना चिंचोक्यांनी दिला दिलासा

googlenewsNext

सिन्नर : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याने उपाययोजना म्हणून देशभरात ‘लॉकडाउन’ पाळले जात आहे. या लॉकडाउनमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांची कामे व अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट भरणाºयांची सद्यस्थितीत उपासमार सुरू झाली आहे. ‘कोरोना’सारख्या संकटाचा सामना करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी ग्रामीण भागात मोलमजुरी करणाºयांना मात्र, चिंचोक्यांनी दिलासा दिला आहे.
‘ना ध्यानी, ना मनी’ असे कोरोनाचे संकट आज देशातील जनतेवर आले आहे. त्याचा फटका अगदी खेड्या-पाड्यातील नागरिकांंनाही बसू लागला आहे. ग्रामीण भागातील मजुरांना आजही कोरोना म्हणजे काय हे माहीत नाही. हे कोरोना संकट निवारण्यासाठी २१ दिवसांचे लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाउनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहे. त्यामुळे अनेक तरुण कामगार व मजुरांना गावाकडची वाट धरावी लागली. तब्बल २१ दिवसांच्या बंदमुळे हातावर पोट भरणाºयांची मात्र, आता उपासमार सुरू झाली आहे. डुबेरे परिसरात विडी मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून, लॉकडाउनमध्ये विडी उद्योगही कोलमडून पडला आहे.
विड्या बांधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºयांचा हात बंद झाला आहे. परिसरात असलेल्या चिंचेच्या व्यापारामुळे चिंच फोडण्याचे काम विडी मजुरांना उपलब्ध झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात उपासमार होण्याचे संकट टळले आहे. विड्या बांधून मुला-बाळांच्या शैक्षणिक खर्चासह कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. मात्र, आता ‘कोरोना’च्या संकटामुळे कामच बंद झाले आहे. त्यामुळे चिंचा उपजीविकेचे साधन बनले आहे. त्या फोडून मिळणाºया पैशातून उपजीविका केली जात आहे.

Web Title: Chinchwakis give relief to the laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.