चिनी प्रवाशाला मिळवून दिले त्याचे चोरीला गेलले साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 11:22 AM2018-01-27T11:22:00+5:302018-01-27T11:22:04+5:30
चीनच्या प्रवाशाची रोकड, लॅपटॉप आदि साहित्य असलेली बॅग रेल्वेतच राहुन गेल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्याला ती परत मिळवून दिली.
नाशिक : मनमाड रेल्वे स्थानकावर खाद्य पदार्थ खाण्यासाठी उतरलेल्या चीनच्या प्रवाशाची रोकड, लॅपटॉप आदि साहित्य असलेली बॅग रेल्वेतच राहुन गेल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर त्याला ती परत मिळवून दिली.
चिनमधुन भारतामध्ये कामानिमित्त आलेले चिनी युवक लिंगुई यू (वय ३०) हे शनिवारी गोरखपूर-पनवेल एक्स्प्रेसने लखनौ ते पनवेल असा वातानुकूलित बोगीतुन प्रवास करीत होते. गोरखपुर एक्स्प्रेस मनमाड स्थानकावर आली असता चिनी रेल्वे प्रवासी लिंगुई यू हे खाद्यपदार्थ घेण्यासाठी रेल्वे स्थानकावर उतरले. दरम्यान गोरखपूर एक्स्प्रेस ही मनमाड रेल्वे स्थानकातुन सुटल्याने लिंगुई यांना रेल्वेत बसणे शक्य झाले नाही. लिंगुई यांची बॅग रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातच राहिली. त्यामध्ये ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, १० हजार रु पयांचे पाणी गरम करण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन व २० हजार रुपये किमतीचे इतर महत्त्वाचे साहित्य, कागदपत्र होते. यामुळे भांबावुन गेलेल्या लिंगुई यांनी तातडीने मनमाड रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांशी संपर्क साधुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. मनमाड येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांनी सदर घटना नाशिकरोडच्या रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक पोलीस निरीक्षक महेश महाले यांना सांगितली. महाले यांनी तत्काळ गोरखपुर एक्स्प्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकात येताच वातानुकूलित डब्यातुन लिंगुई यांची बॅग उतरवुन घेतली. त्यानंतर मनमाड येथुन दुसºया रेल्वेने लिंगुई हे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आले असता महाले यांनी लिंगुई यांना बॅग पुन्हा मिळवुन दिली. याबद्दल लिंगुई यांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाºयांच्या जागरूकता व तत्परतेबाबत आभार मानले.