चिंचावडला ग्रामसभा उत्साहात
By admin | Published: August 16, 2014 10:44 PM2014-08-16T22:44:06+5:302014-08-17T00:32:16+5:30
चिंचावड : येथे सरपंच बापू बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली
चिंचावड : येथे सरपंच बापू बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. त्यात रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी घरकुल लाभार्थी योजना, सातबाई
मंदिर ते गावापर्यंत जलवाहिनी टाकणे, नळस्टॅँड, विहीर
पुनर्भरण योजना याविषयी चर्चा करण्यात आली. कृषी सहाय्यक सोमसिंग पवार यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांविषयी माहिती दिली. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निमगावी अखंड
हरिनाम सप्ताह
ंमालेगाव : तालुक्यातील निमगाव येथील श्रीराम व हनुमान मंदिर येथे सालाबादप्रमाणे स्वातंत्र्यदिनापासून अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण
सोहळा झाला. त्यात रोज काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण,
प्रवचन व हरिपाठ - हरिकीर्तन आदि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ आॅगस्टला ह. भ. प. संजय महाराज दुकळे जळगावकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसाद वाटपाने या सप्ताहाची सांगता होईल. या धार्मिक कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी
केले आहे.
रिपाइंचा रविवारी तालुका मेळावा
मालेगाव : रिपब्लिकन
पार्टी आॅफ इंडिया ( गवई ) गटाचा बागलाण तालुका कार्यकर्ता मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला आहे. संत सावता महाराज मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गरुड हे भूषविणार आहेत. मेळाव्यात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष देवराज गरुड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पंडितराव वानखेडे मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे तालुकाध्यक्ष गोरक्ष वानखेडे, सरचिटणीस कारभारी अहिरे, प्रल्हाद म्हसदे, संजय दाणी, राजेश अहिरे
आदिंनी केले आहे.