भजनस्पर्धेत चिपळूण, कोल्हापूरचे मंडळ प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 07:53 PM2020-01-31T19:53:41+5:302020-01-31T19:54:08+5:30

या स्पर्धेसाठी धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, चिपळूण आदींसह राज्यभरातील कामगार भजनी मंडळ संघाचे पाचशे कलाकार सहभागी झाले होते.

Chiplun in the hymn competition, Kolhapur board first | भजनस्पर्धेत चिपळूण, कोल्हापूरचे मंडळ प्रथम

भजनस्पर्धेत चिपळूण, कोल्हापूरचे मंडळ प्रथम

Next
ठळक मुद्देकामगार कल्याण मंडळ : राज्यस्तरीय स्पर्धेचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे तपोवनातील राष्ट्रीय संत श्री जनार्दन स्वामी आश्रमात घेण्यात आलेल्या दोन दिवसीय २६वी कामगार पुरुष व १६वी महिला राज्यस्तरीय भजन स्पर्धेत पुरुष गटातून चिपळूण आणि महिला गटातील कोल्हापूर महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.


महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड, चिपळूण आदींसह राज्यभरातील कामगार भजनी मंडळ संघाचे पाचशे कलाकार सहभागी झाले होते. एकोणावीस कामगार भजनी मंडळ, तर एकोणावीस महिला भजनी मंडळ अशा ३८ संघांनी सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धा पुरुष, महिला गटात घेण्यात आल्या. पुरुष कामगार गटातून प्रथम क्रमांक चिपळूण (कणकवली) भजनी मंडळ मिळविला, तर नागपूर (इंदोरा) भजनी मंडळ द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान सांगली (कुंडल) भजनी मंडळाला मिळाला आहे, तर महिला गटातील कोल्हापूर (बिंदू चौक) प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. अकोला (पोळा चौक) भजनी मंडळाने द्वितीय, तर लातूरचे (उदगीर) भजनी मंडळ तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सहभागी झालेल्या भजनी मंडळाने जय जय रामकृष्ण हरी, अभंग, तसेच गवळण सादर केल्या. राज्यस्तरीय भजनी मंडळात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भजनी मंडळाला दहा हजार, द्वितीय आठ हजार, तर तृतीय क्रमांकाला सहा हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ भजनी मंडळाला तीन हजार रुपये रोख चषक आणि प्रशस्तिपत्र देण्यात आले. यावेळी भगिरथ काळे, नाशिकचे प्रभारी सहायक आयुक्त सयाजी पाटील यांच्या उपस्थितीत विजेत्या भजनी मंडळाला पारितोषिक वितरण करण्यात आले. सुमित्रा सोनवणे, हर्षद वडजे, नीलेश गाढवे यांनी भजन स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम बघितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांनी केले. सहायक कल्याण आयुक्तडॉ. घन:श्याम कुळमेथे यांनी आभार मानले.

Web Title: Chiplun in the hymn competition, Kolhapur board first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.