चिट फंड घोटाळा : गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कामगिरी सव्वादोन कोटींची फसवणूक करणाऱ्यांच्या बांधल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:23 AM2018-04-06T01:23:40+5:302018-04-06T01:23:40+5:30
नाशिक : गुंतवणुकीवर दामदुप्पट आमिषापोटी बहुतांश गुंतवणूकदारांची अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणाºया तिघा भामट्यांना नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली.
नाशिक : गुंतवणुकीवर दामदुप्पट आमिषापोटी बहुतांश गुंतवणूकदारांची अहमदनगर जिल्ह्यात फसवणूक करणाºया तिघा भामट्यांना नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने अटक केली. त्यांच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याने तिघांना नगर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी अहमदनगर, पुणे जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाºया कोपरगावच्या तिघे संशयित नाशिकमध्ये वावरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक विजय लोंढे, श्रीराम सपकाळ, राजाराम वाघ, योगेश सानप आदींच्या पथकाने शहरातील संशयित ठिकाणी भामट्यांचा माग काढला. दरम्यान, मुंबईनाका व पाथर्डीफाटा येथून पथकाने संशयित प्रवीण वरगुडे, दिगंबर बैरागी, राजू जेजूरकर यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली. वरगुडे याने कबुली देत कोपरगाव येथे व्हिनस नावाची कंपनीकरिता फिर्यादी विठ्ठलराव धुमाळ (रा.चिंचोली, शिरुर) यांनी मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. या तिघांविरुद्धवरील तिघा संशयितांविरुद्ध धुमाळ यांनी फिर्याद दिल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या तिघांनी पुणे जिल्ह्णातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्णातील राहता तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक गुंतवणूकदारांची हजारो ते लाखो रुपयांची फसवणूक केली. एकूण सव्वादोन कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती तपासात पुढे आली.
नाशिक टार्गेट?
गुंतवणूक रकमेवरील जादा व्याजाचे धनादेश तात्पुरत्या स्वरूपात गुंतवणूकदारांना भामटे देत होते. धनादेश दिल्यानंतर व्याजाचे आमिष दाखवत वाढीव धनादेश देतो, असे सांगून अगोदर दिलेले धनादेश ताब्यात घेत तिघांकडून गुंतवणूकदारांना भूलथापा दिल्या जात होत्या, असे तपास पथकाचे देवडे यांनी सांगितले. दरम्यान, या तिघांचा नाशिकमध्ये कधीपासून वावर होता व ते कोणाच्या संपकर् ात आले होते आणि त्यांच्याकडून पुणे, अहमदनगरनंतर नाशिक ‘टार्गेट’ केले जाणार होते का? अशा सर्व बाबींचा अंदाज बांधत गुन्हे शाखा तपास करत आहे.