प्रसादात मोदकासह चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 10:25 PM2020-08-24T22:25:16+5:302020-08-25T01:13:33+5:30

नाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदार्थही गौरी पूजनासाठी उपलब्ध झाले आहे.

Chocolate with Modak in Prasad, sweet of dried fruits | प्रसादात मोदकासह चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी

प्रसादात मोदकासह चॉकलेट, ड्रायफ्रुट्सची गोडी

googlenewsNext
ठळक मुद्देगोडधोड पदार्थांची मेजवाणी : रवा, बुंदी आणि बेसन लाडूलाही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लाडक्या गणरायाच्या प्रसादासाठी यंदा मावा आणि मलई मोदकाबरोबर यंदा चॉकलेट, ड्रायफ्रुट्स, आंबा, स्ट्रॉबेरी फ्लेवरचे मोदकांची क्रेझ मिठाई दुकानात दिसू लागली आहे. तयार मोदकांचा भाव चारशे ते सहाशे रुपये किलो असून, गोड मिठाईबरोबर चटकदार, झणझणीत फराळांचे पदार्थही गौरी पूजनासाठी उपलब्ध झाले आहे.
कोरोना आणि टाळेबंदी अशा दुहेरी संकटचे करू अनुभव बाजूला ठेऊन भाविकांनी घरोघरी विघ्नहर गणरायांचे जल्लोषात स्वागत करून बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवला. यंदा घरगुती गणपती उत्सव दहा दिवस असल्याने गोडधोड पदार्थांची मेजवाणी असणार आहे. लाडक्या गणेश बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवला जातो.
गूळ खोबऱ्याच्या मोदकाबरोबर मिठाईच्या दुकानात खवा, मलई मोदकाला मोठी मागणी आहे. खव्याच्या मोदकामध्ये पिस्ता, आॅरेंज हे दोन कलर असून मलई मोदकामध्ये आँरेज, स्ट्रॉबेरी, अंजीर, चॉकलेट मोदक ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. छोट्या आकाराचे २१ चॉकलेटी मोदकांचा बॉक्स उपलब्ध आहे.
काही बेकरीमध्ये मोदकाच्या आकाराचा शाकाहारी केकही आॅर्डरप्रमाणे उपलब्ध करुन दिले जात आहेत. गणपतीबरोबर गौरीचा सणही मोठ्या प्रमाणावर घरोघरी साजरा केला जातो.
गौरीची बडदास्त करताना तिच्यासमोर गोड मिठाईबरोबर फराळाचे तिखट पदार्थांची मांडणी केली जाते.
चकली, चिवडा, शंकरपाळी, पापडी, बाकरवडीला मोठी मागणी आहे. गणेश आगमनानंतर गौरी आगमनापूर्वी फराळांच्या पदार्थांना मागणी वाढते असे व्यावसायिकांनी सांगितले. विविध प्रकारचे फरसाण, चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव अशा फराळाच्या विविध पदार्थांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. फराळ घरी करण्यापेक्षा तयार आणण्याकडे महिला वर्गाचा कल अधिक दिसून येत आहे.यामुळे बाप्पाच्या आरतीनंतर मिळणाºया प्रसादात नवनवीन पदार्थांची चव भाविकांना चाखायला मिळत आहे.बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीला मोठी मागणीमोदकात मॅगोचे सारण असल्याने आंबड गोड चवीमुळे चॉकलेट मोदकाला पसंती मिळत आहेत. मोदकाबरोबर खाजा, बालुशाही, म्हैसूरपाक, बुंदीला मोठी मागणी आहे. बुंदीच्या मोठ्या आकाराच्या मोदकाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. रवा, बुंदी आणि बेसन लाडूलाही मागणी आहे.

Web Title: Chocolate with Modak in Prasad, sweet of dried fruits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.