विकृत चाळे करणाºयास महिलांकडून चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:55 AM2017-10-27T00:55:04+5:302017-10-27T00:55:20+5:30

इंदिरानगर परिसरात यापूर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत विकृत चाळे करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

Chopped by women, they are distorted | विकृत चाळे करणाºयास महिलांकडून चोप

विकृत चाळे करणाºयास महिलांकडून चोप

Next

इंदिरानगर : इंदिरानगर परिसरात यापूर्वी दुचाकीवरून येत एका तरुणाने महिला-मुलींची छेडछाड करत विकृत चाळे करण्याचा ‘उद्योग’ सुरू केला होता. यानंतर काही दिवसांपासून येथील राजसारथी सोसायटी, आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक इसम चारचाकीमधून येऊन महिला-मुलींची छेड काढत विकृत चाळे करत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर महिलांनी त्याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमारे दोन ते तीन महिन्यांपासून आत्मविश्वास सोसायटीच्या परिसरात एक विकृत प्रवृत्तीचा इसम रात्री-मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकी कार (एमएच १६ एबी ०४१३) मधून येऊन खाली उतरत परिसरातील महिला-मुलींची छेड काढून अश्लील चाळे करत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यानंतर सदर बाब दक्ष नागरिकांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली; मात्र पोलिसांना तो मिळून आला नाही. अखेर महिलांनी त्याच्यावर पाळत ठेवून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ रचला. दरम्यान, विकृत इसम राजेंद्रकुमार तिवारी (३२) हा परिसरात नेहमीप्रमाणे आला आणि वाहनातून उतरून चाळे करू लागला. अश्लील नजरेने महिला-मुलींकडे बघून हावभाव करत असल्याचे लक्षात आल्यानंतर एका महिलेने त्याला हटकले. यावेळी तिवारी याने तिचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला; मात्र सदर बाब परिसरातील अन्य महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला धरून ‘अ‍ॅक्शन प्लॅन’नुसार पायातल्या जोड्यांनी चोपून काढले. गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर, राणेनगर परिसरात गुन्हेगारीत वाढ झाल्याने नागरिकांत चिंता व्यक्त होत आहे.

Web Title: Chopped by women, they are distorted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.