नाताळनिमित्त संदेश यात्रा ; चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:09 AM2018-12-24T01:09:27+5:302018-12-24T01:10:17+5:30
ख्रिस्तीबांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील चर्चमध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : ख्रिस्तीबांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील चर्चमध्ये विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नाताळनिमित्त रविवारी (दि.२३) सायंकाळी संत आंद्रिया चर्च व ख्रिस्ती बांधवांच्या वतीने प्रभू येशूचा संदेश देणारी शुभ संदेश यात्रा काढण्यात आली. या संदेश यात्रेत प्रभू येशूच्या जीवनावर आधारित व सांताक्लॉज यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला होता. शरणपूर रोडवरील संत आंद्रिया चर्च येथून सुरू झालेली ही संदेश यात्रा शहरातील कॉलेजरोड, शरणपूररोड सिग्नल, सीबीएस, शालिमार, खडकाळी सिग्नल, अण्णा भाऊ साठे पुतळा, जिल्हा परिषद, त्र्यंबक नाका, सिव्हिल हॉस्पिटल, मायको सर्क ल, शरणपूर रोड मार्गे संत आंद्रिया चर्च येथे पोहचल्यावर या संदेश यात्रेचा समारोप करण्यात आला.
या यात्रेत शहरातील विविध भागातील ख्रिस्ती समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.