सौंदाणेत पिण्याच्या पाण्यासाठी साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:39 AM2018-08-17T00:39:38+5:302018-08-17T00:40:21+5:30
मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाला पिण्याचे पाणी गिरणा उजवा कालव्याद्वारे गावतळे, चारी क्र मांक १, गलाठी नदीवरील बंधारा व गाव परिसरातील सर्व चारींमध्ये पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सौंदाणेला साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच जनावरांसाठी शेती परिसरात पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आवारात साखळी उपोषण केले असता पाटबंधारे विभागाचे अधिकारी वसंतराव इंगळे आणि माजी सभापती भरत पवार यांनी मध्यस्थी करून आपल्या मागण्या वरिष्ठांकडे पाठवून त्या लवकर मान्य केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात चेतन पवार, केशव नाना, सागर पवार, किरण पवार, महेश पवार, संदीप पवार, सुनील पवार, बप्पू अहिरे, संजय पवार, राघो पवार, प्रवीण क्षत्रिय, भैया पवार आदी सहभागी झाले होते.