ग्रामपंचायतीमध्ये ५८९५ जागांसाठी चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:12 AM2020-12-26T04:12:48+5:302020-12-26T04:12:48+5:30
नाशिक: डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जिल्ह्यात होत असून, ५८९५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास ...
नाशिक: डिसेंबरमध्ये मुदत संपुष्टात येणाऱ्या ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक जिल्ह्यात होत असून, ५८९५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात १३८५ ग्रामपंचायती आहेत यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कालावधी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये संपुष्टात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास तीन दिवस झाले असून, ११७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. येत्या ३० तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. लहान-मोठ्या अशा ६२१ ग्रामपंचायती आहेत. कमीत कमी ७, तर जास्तीत जास्त १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायती आहेत. यामध्ये सात सदस्य संख्या असलेल्ाय ग्रामपंचायतींची संख्या १५३ इतकी आहे, तर १७ सदस्यसंख्या असलेल्या २३ ग्रामपंचायती आहेत. सर्वाधिक २९१ ग्रामपंचायती अशा आहेत की ज्यांची सदस्यसंख्या ९ इतकी आहे. १०८ ग्रामपंचायतींची सदस्यसंख्या अकरा इतकी आहे. ३२ ग्रामपंचायतीमध्ये १३ तर १५ सदस्यसंख्या असलेल्या १४ ग्रामपंचायती आहेत.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी अनेक नियम आहेत. त्यामुळे त्यांना नियमांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यंदा ऑनलाइन अर्ज दाखल करावयाचे असल्याने ग्रामीण भागात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे त्यांना तालुक्याच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी यावे लागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरू झाल्यापासून पहिल्या दिवशी दोन तर दुसऱ्या दिवशी ११५ असे एकुण ११७ इतके अर्ज दाखल झाले आहेत.
--इन्फो--
ग्रामपंचायत स्थिती पुढीलप्रमाणे
ग्रामपंचायती सदस्यसंख्या एकूण सदस्य
१५३ ०७ १०७१
२९१ ०९ २६१९
१०८ ११ ११८८
३२ १३ ४१६
१४ १५ २१०
२३ १७ ३९१
---------------------------------
६२१ ५८९५