पळसनला आदिवासींचे मंथन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 11:13 PM2019-11-26T23:13:10+5:302019-11-26T23:25:34+5:30
सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्याकरिता उलगुलान पुकारले आहे. यावेळी बोलावलेल्या बैठकीत आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगताना भेडसावणाºया अनेक गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली.
सुरगाणा : तालुक्यातील पळसन येथे युवकांनी संघटन करून आदिवासींच्या समस्या सोडविण्याकरिता उलगुलान पुकारले आहे. यावेळी बोलावलेल्या बैठकीत आद्य क्र ांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बैठकीत आदिवासींना दैनंदिन जीवन जगताना भेडसावणाºया अनेक गंभीर समस्यांवर चर्चा करण्यात आली.
उलगुलान म्हणजे अन्यायाविरु द्ध संघटित लढा देणे. यासाठी तालुक्यातील आदिवासी युवकांची एकच संघटना ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सुरगाणा तालुका हा पावसाचे माहेरघर, परंतु पाणी अडवले नसल्यामुळे तालुक्यातील बरेच गावांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे आतापासूनच ज्या ठिकाणी पाणी असेल अशा ठिकाणी तरुणांनी एकत्र येऊन वनराई बंधारे बांधावे, असे जल परिषदेचे योगेश गावित यांनी सांगितले.
या प्रकारच्या समस्या हेरून त्यांचा शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी प्रत्येक गावपातळीवरील बेरोजगार युवकांनी संघटितपणे लढा देण्याची गरज असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. याकरिता आदिवासींच्या न्याय्य-हक्कासाठी लढा उभारून, आदिवासी विकास युवा संघर्ष संघटना, स्थापन करण्यात आली आहे.
बैठकीस आदिवासी बचाव कृती समितीचे तालुकाप्रमुख रतन चौधरी, आदिवासी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार, आदिवासी युवा संघर्ष प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष दीपक चव्हाण, हेमराज धूम हरिश्चंद्र धूम, संजय पाडवी, सचिन महाले, प्रशांत माळघरे, गणेश वाघमारे, योगेश गावित आदींसह तालुक्यातील युवक उपस्थित होते. सुनील भुसारे यांनी प्रास्ताविक केले.शेतीसिंचनाचा प्रश्न गंभीरअन्य तालुक्याच्या तुलनेत सुरगाणा तालुक्यात पावसाळ्यात सरासरी अडीच ते तीन हजार मिलिमीटर पाऊस पडतो. तरी उन्हाळ्यात तालुक्यातील निम्म्याहून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. आजपर्यंत तालुक्यात शेतीसिंचनासाठी एकही मोठे धरण का झाले नाही, असा सवाल करत विविध समस्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.