सिडकोत तीन लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:54+5:302021-04-28T04:15:54+5:30

महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनेच्या आनुषंगाने सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न ...

CIDCO collects fine of Rs 3 lakh | सिडकोत तीन लाखांचा दंड वसूल

सिडकोत तीन लाखांचा दंड वसूल

Next

महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय योजनेच्या आनुषंगाने सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणारे २१२ केसेस, नियमबाह्य दुकान चालू ठेवणारे १५ केसेस, कचरा वर्गीकरण न केल्याबाबत तीन, प्रतिबंधित प्लॅस्टिक वापर केल्याबद्दल व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून अस्वछता केल्याबाबत २६३ कारवाया करीत सुमारे तीन लाख ४ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.

कोट====

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने याबाबत नागरिकांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क न लावता घराबाहेर पडू नये तसेच सुरक्षित अंतर पाळणे गरजेचे असून, नागरिकांनी त्याचे पालन करावे असे न झाल्यास नाईलाजाने दंडात्मक कारवाई करावी लागेल.

- संजय गांगुर्डे, स्वच्छता निरीक्षक

Web Title: CIDCO collects fine of Rs 3 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.