सिडको विभाग : महापालिकेचे दुर्लक्ष, वाहतुकीला अडथळाहातगाड्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:01 AM2018-03-02T02:01:03+5:302018-03-02T02:01:03+5:30
सिडको : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले.
सिडको : येथील गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून हातगाडी व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले असल्याने वाहनधारकांना त्रास होत असून, यामुळे अपघातही होत आहेत. याबाबत महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असून, कारवाई केली जात नसल्याने अतिक्रमणात वाढ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको भागातील मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणामुळे रस्त्याने चालणे मुश्कील होत असतानाच आता गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरदेखील अतिक्रमण झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या अतिक्रमणात महापालिकाच जबाबदार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, शिवाजी चौक, उपेंद्रनगर, अंबड परिसर यांसह संपूर्ण सिडको भागातील मुख्य रस्ते तसेच बाजारपेठ असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. ळविक्रेते, भाजीपाला व्यावसायिक यांबरोबरच विविध व्यवसाय करणाºयांची संख्या वाढतच चालल्याने रस्त्याने वाहन चालविणे मुश्कील होत असून, यामुळे अपघातही होत आहे. गोविंदनगर जॉगिंग ट्रॅक ते सिटी सेंटर मॉलकडे जाणारा मुख्य रस्ता हा चांगला करण्यात आला असून, सुशोभिकरणही करण्यात आले आहे. परंतु केवळ मनपा अधिकारी चिरीमिरी घेत असल्याने अतिक्रमणांत वाढ होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. याच रस्त्याच्या साइटपट्ट्यांवरदेखील मोठ्या प्रमाणात झाडांचा पालापाचोळा साचलेला असून, अस्वच्छता असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.