सिडको प्रभाग सभापती : सेनेच्या बडगुजर बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 01:09 AM2018-04-21T01:09:28+5:302018-04-21T01:09:28+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचे वर्चस्व असलेल्या महापालिकेच्या सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार भगवान दोंदे यांनी माघार घेतल्याने प्रभाग सभापतिपदी शिवसेनेच्या हर्षा बडगुजर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
सिडको : गेल्या अनेक वर्षांपासून सेनेचे वर्चस्व असलेल्या महापालिकेच्या सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार भगवान दोंदे यांनी माघार घेतल्याने प्रभाग सभापतिपदी शिवसेनेच्या हर्षा बडगुजर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सिडको प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेकडून हर्षा बडगुजर व भाजपाकडून भगवान दोंदे यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. आज सकाळी १२.३० वाजेच्या सुमारास मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयात जिल्हाधिकारी बी. राधाकृष्ण यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणुकीला प्रारंभ झाला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दोघा उमेदवारांना वैध घोषित केल्यानंतरमाघारीसाठी पंधरा मिनिटांची वेळ दिल्याने या वेळात भाजपाचे उमेदवार भगवान दोंदे यांनी माघार घेतली. यामुळे सेनेच्या उमेदवार हर्षा बडगुजर यांची सिडको प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. गेल्या अनेक वर्षांपासून सिडको प्रभागावर शिवसेनेचाच वरचष्मा असून, मनपा निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही प्रभाग सभापती हा सेनेचाच होणार असल्याचे निश्चितच मानले जात होते. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेच्या कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव आदींचा समावेश आहे. पक्षीय बलाबलात शिवसेना १४, भाजपा ९ व राष्टÑवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल असल्याने निवडणूक झाली असती तरी सेनेकडे भाजपापेक्षा पाच नगरसेवक अधिक आहे. यावेळी शिवसेना नाशिक पश्चिम विधानसभा संपर्क प्रमुख नीलेश चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख महेश बडवे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते.