सिडकोत अनेक दुकाने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:15 AM2021-04-07T04:15:19+5:302021-04-07T04:15:19+5:30
दाट लोकवस्ती असलेल्या सिडको तसेच अंबड भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली ...
दाट लोकवस्ती असलेल्या सिडको तसेच अंबड भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ही सर्वांसाठीच चिंतेची बाब ठरली आहे. सिडको भागात दररोज रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महापालिका व अंबड पोलीस प्रशासनाच्यावतीने भाजी बाजाराच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या. परंतु त्यादेखील फोल ठरल्या. सोमवारी रात्रीपासून शासनाच्यावतीने कडक निर्बंध लागू करण्यात आले. सिडको भागात प्रत्येक गल्लीबोळात ‘आगे दुकान पीछे मकान’ अशी परिस्थिती असल्याने कितीही कडकडीत बंद केले असले तरी सिडकोतील दुकाने मात्र आज सकाळपासूनच बऱ्यापैकी उघडी असल्याचे चित्र पहावयास मिळाले. भाजीबाजार, किराणा दुकान याचबरोबर इतर खाद्यपदार्थ या दुकानातही सकाळपासूनच गर्दी दिसून आली. यामुळे ब्रेक द चेन ही शासनाची योजना सिडको भागात फोल ठरल्याचे चित्र बघायला मिळत आहे. आगामी काळात अशीच परिस्थिती राहिल्यास सिडकोतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिकच वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून ही सर्वांसाठीच चिंतेची बाब आहे.
चौकट
आगे दुकान पीछे मकान असलेल्या सिडको भागातील बहुतांशी नागरिकांनी त्यांच्या घराच्या पुढच्या बाजूला दुकान टाकले आहे. त्या दुकानाच्या मागील बाजूस वास्तव्य करतात. यामुळे दुकानदारी बंद करा असे सांगितले असले तरी त्यांच्या घरात जाण्याचा रस्ता एकच असल्यामुळे नागरिक दुकानाचे शटर अर्धे खाली करून कडकडीत बंद असतानाही व्यवसाय करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
===Photopath===
060421\06nsk_24_06042021_13.jpg
===Caption===
सिडको बंद