सिडको मनपा विभागीय कार्यालय वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 01:07 AM2019-01-30T01:07:04+5:302019-01-30T01:07:34+5:30
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळात बहुतांशी सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी जेवणासाठी जाताना कार्यालयाची सुरक्षितता वाºयावर सोडत असून, कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर तशीच सोडून जाताना, कार्यालयातील विजेचे दिवे, पंखेदेखील सुरू ठेवून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहोचवित आहेत.
सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात दुपारी जेवणाच्या सुट्टीच्या वेळात बहुतांशी सर्वच विभागांतील अधिकारी, कर्मचारी जेवणासाठी जाताना कार्यालयाची सुरक्षितता वाºयावर सोडत असून, कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर तशीच सोडून जाताना, कार्यालयातील विजेचे दिवे, पंखेदेखील सुरू ठेवून महापालिकेला आर्थिक नुकसान पोहोचवित आहेत. अधिकारी, कर्मचाºयांच्या या बेदरकार वृत्तीचा फायदा समाजकंटकाकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांना कामावर येण्याची आणि कामावरून घरी जाण्याची वेळ निश्चित केलेली असतानाही अनेकदा कर्मचारी हे उशिराने कामावर हजर होत असल्याचे निदर्शनात आले आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या समारे असलेल्या महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात प्रशासन विभाग, बांधकाम, घरपट्टी, पाणी बिल, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, विविध कर यांसह मनपाशी संबंधित कामाकाजासाठी सिडको, अंबड व पाथर्डीसह परिसरातील नागरिक येथे येत असतात. मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजता मनपाच्या सिडको कार्यालयातील विभागीय अधिकाºयांचे दालन असलेल्या प्रशासन विभाग, घरपट्टी विभाग, विविध कर मिळकत विभाग (अतिक्रमण), पाणीपुरवठा विभाग आदी विभागांतील दालनांमध्ये अधिकारी अथवा कर्मचारी हे जेवणाच्या सुटीत बाहेर गेलेले असताना या दालनातील लाइट सुरूच असल्याचे दिसून आले. याच दालनांमध्ये महत्त्वाची कागदपत्रे टेबलावर ठेवण्यात आलेली असताना कामकाज करण्यासाठी येणारे नागरिक या दालनांमध्ये सहज मुक्त संचार करताना दिसून येत होते. या दालनातील टेबलांवर महत्त्वाचे कागदपत्र ठेवलेले असताना जेवणाच्या सुटीच्या वेळात या दालनांमध्ये एखादा कर्मचारी असणे गरजेचे असतानाही कर्मचारी आपल्याच कार्यालयाबाबत बेफिकीर असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मनपाच्या सर्वच दालनातील कागदपत्रे ही नागरिकांच्या कामाशी निगडीत असून, महत्त्वाची आहे. यामुळे दालनातून बाहेर जाताना अथवा जेवणाच्या सुटीच्या वेळात याठिकाणी एखादा कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु जेवणाच्या सुटीच्या वेळात दालनात एकही कर्मचारी हजर राहत नसल्याने ही गंभीर बाब आहे. याबाबत विभागीय अधिकाºयांना जाब विचारणार असून, यापुढील काळात यात सुधारणा करणार. - हर्षा बडगुजर, सभापती, सिडको विभाग