सिडको, पंचवटी भागात रंगपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:05 AM2019-03-28T00:05:36+5:302019-03-28T00:05:54+5:30

शहरातील विविध भागांत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ सिडको, सातपूर, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड, अंबड आदी भागात तरूणांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांच्या आंगावर रंगांची उधळण करीत जल्लोष केला़

 Cidco, in Panchavati, with colorful enthusiasm | सिडको, पंचवटी भागात रंगपंचमी उत्साहात

सिडको, पंचवटी भागात रंगपंचमी उत्साहात

Next

नाशिक : शहरातील विविध भागांत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ सिडको, सातपूर, पंचवटी, म्हसरूळ, नाशिकरोड, अंबड आदी भागात तरूणांनी रंगपंचमी निमित्त एकमेकांच्या आंगावर रंगांची उधळण करीत जल्लोष केला़
रस्त्यावर व चौकाचौकात बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिकांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. सिडको व अंबड भागात रंगपंचमी साजरी करण्यात आली. लहान मुलांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. बहुतांशी ठिंकाणी पाण्याचा वापर न करता पारंपरिक कलरचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. दरम्यान, शहरातील विविध शाळांमध्ये रंगपंचमी निमित्त विद्यार्थ्यांनी कोरडा रंग लाऊन पर्यावरणपूरक रंगपंचमी साजरी केली़
रासबिहारी शाळेत रंगोत्सव उत्साहात
 रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील शिशुवृंदात होळी व रंगोत्सव सण उत्साहात साजरा करण्यात आला. बालगोपाळांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून तसेच पाण्याचा वापर न करता नैसर्गिक समतोल राखत उत्सव साजरा केला. पाण्याची कमतरता आणि पाणी वाचविणे कसे महत्त्वाचे आहे याची माहिती चिमुकल्यांना सांगण्यात आली. हा सण म्हणजे वाईट गोष्टी आणि विचार यांवर चांगल्या विचारांचा विजय तसेच हा सण म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाचे विविध रंगीबेरंगी रंगांची उधळण करून स्वागत केले जाते.
सेंट लॉरेन्स हायस्कूल
अश्विन नगर सिडको येथील सेंट लॉरेन्स हायस्कूलमध्ये प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी रंगपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना होळी व रंगपंचमी हा भारतीय पारंपरिक सण काा साजराा करतात याविषयीची पौराणिक कथा ही ध्वनिचित्रफित दाखवून समजावण्यात आली. विद्यार्थ्यांनी शालेय मैदानावरील कचरा गोळा करुन त्याची होळी तयार केली. याप्रसंगी शिक्षकवृंदांनी पर्यावरणपूरक रंगपंचमी करण्याचे तसेच रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंग तसेच कोरडे रंग वापरुन होळीचाा आनंद आपण द्विगुणित करु शकतो हा संदेश दिला.

Web Title:  Cidco, in Panchavati, with colorful enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.