उड्डाणपुलाच्या विरोधासाठी सिडकोत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:12 AM2020-12-29T04:12:50+5:302020-12-29T04:12:50+5:30
नियोजित उड्डाणपुलाच्या पुलाला विरोध केला जात असून, त्यासाठी व्यापारी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. या मार्गामधील अनेक वर्षांपासून ...
नियोजित उड्डाणपुलाच्या पुलाला विरोध केला जात असून, त्यासाठी व्यापारी आणि स्थानिक नागरिक एकवटले आहेत. या मार्गामधील अनेक वर्षांपासून मध्यम वर्गीय कुटुंबातील अनेक नागरिक उपजीविकेसाठी छोटे-मोठे व्यवसाय, तसेच किरकोळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत आहेत. त्याचप्रमाणे, या मार्गावर १५० वर्षांपूर्वीचे म्हसोबा महाराज मंदिर व वटवृक्ष (वड) आहे, तसेच ३ ते ४ पिढीपासून उंटवाडी गाव आहे. तेथे स्थानिक रहिवासी, गावकरी या ठिकाणी राहत आहे.
त्यामुळे सदर होणाऱ्या नियोजित उड्डाणपुलामुळे स्थानिक रहिवासी गावकरी, छोटे-मोठे व्यापारी यांचे नुकसान होणार असल्याचा नागरिकांचा संशय आहे. नियोजित उड्डाणपुलास नागरिकांचा, रहिवाशांचा व्यापाऱ्यांचा, तीव्र विरोध लक्षात घेता, सदर उड्डाणपुलाचे नियोजित काम रद्द करण्यात यावे, अन्यथा तेथील नागरिक व्यापारी, उंटवाडी ग्रामस्थ व स्थानिक रहिवासी यांना बरोबर घेत, तीव्र स्वरूपाचे आंदोलन चेपण्याचा इशारा किशोर घाटे यांनी दिला आहे. यावेळी नीलेश जाजू, पिंटूसेठ घोरपडे, अशोक ठक्कर, प्रीतेश ठक्कर आदींसह ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
फोटो ओळीं :
त्रिमूर्ती चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक उंटवाडी रोड नाशिक येथील नियोजित होणाऱ्या उड्डाणपुलाला विरोध करण्यासाठी निदर्शने करताना किशोर घाटे, नीलेश जाजू, पिंटूसेठ घोरपडे, अशोक ठक्कर, प्रीतेश ठक्कर आदींसह ग्रामस्थ. (फोटो:आर:फोटो:२७सिडको आंदोलन)
Attachments area