अतिक्रमण निर्मूलनासाठी सिडको सज्ज

By admin | Published: November 23, 2015 10:49 PM2015-11-23T22:49:57+5:302015-11-23T22:53:55+5:30

अर्जांचे होणार निर्मूलन : पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणांवर पडणार हातोडा

CIDCO ready for elimination of encroachment | अतिक्रमण निर्मूलनासाठी सिडको सज्ज

अतिक्रमण निर्मूलनासाठी सिडको सज्ज

Next

सिडको : सिडकोमधील अतिक्रमण निर्मूलनासाठी आता सिडको प्रशासन सज्ज झाले आहे. ज्या नागरिकांनी अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दिले आहेत, अशा तक्रारींचे निरसन करण्यास सुरुवात करण्यात आली असून, या तक्रारींबरोबरच इतर वाढलेल्या अतिक्रमणांवरही प्रशासन हातोडा मारणार असल्याने अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहे.
सिडको प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी विकत घेत त्या जागेत सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा दरात घरांची निर्मिती केली आहे. परंतु याच घरांवर आता अतिक्रमण करून टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने सिडकोत अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सिडको प्रशासनाने सहा योजनांपैकी एक ते पाच योजना या मनपाकडे हस्तांतरित केल्या आहेत. सहावी योजना मात्र अद्यापही हस्तांतरित झालेली नाही. परंतु प्रशासनाने हस्तांतरित केलेल्या पाचही योजनांकडील बांधकाम परवानगीचे हक्क स्वत:कडेच ठेवले आहेत. एक ते पाच योजना या मनपाकडे हस्तांतरित केल्या असल्यातरी बांधकाम परवानगीसाठी नागरिकांना सिडको प्रशासनाकडेच जावे लागते. यामुळे मनपानेही वाढत्या अतिक्रमणांपासून दूर राहणेच पसंत केले आहे. तसेच सिडको प्रशासनाकडे बांधकाम परवानगीचे अधिकार असल्याने येथील अतिक्रमण काढण्याचीही जबाबदारी ही सिडकोचीच असल्याचे मनपाकडून सांगण्यात येते. आजमितीला सिडको भागात सिडको प्रशासनाच्याच आशीर्वादाने अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमण काढण्यात यावे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने प्रशासनानेही आता याकडे लक्ष केंद्रित केल्याच सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी मोहीम हाती घेतली असून, काही दिवसांपासून त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर, सिंहस्थनगर येथील नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे निरसन करण्यास सुरुवात केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींपाठोपाठच रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवरही हातोडा मारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: CIDCO ready for elimination of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.