संचलनप्रसंगी पोलिसांवर सिडकोवासीयांची पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 02:10 AM2020-04-22T02:10:35+5:302020-04-22T02:10:55+5:30

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या पोलिसांच्या संचलनाप्रसंगी अनेक चौकाचौकांमध्ये पोलिसांचे स्वागत करून नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. तसेच अनेक महिलांनी पोलिसांना ओवाळून त्यांच्या कार्याबद्दल नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.

Cidco residents showered flowers on the police during the operation | संचलनप्रसंगी पोलिसांवर सिडकोवासीयांची पुष्पवृष्टी

संचलनप्रसंगी पोलिसांवर सिडकोवासीयांची पुष्पवृष्टी

Next

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या पोलिसांच्या संचलनाप्रसंगी अनेक चौकाचौकांमध्ये पोलिसांचे स्वागत करून नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. तसेच अनेक महिलांनी पोलिसांना ओवाळून त्यांच्या कार्याबद्दल नागरिकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
सध्या संचारबंदीसुद्धा लागू करण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी, अशा उद्देशाने आज अंबड पोलिसांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचलन केले.
या संचलनात सहायक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, सुभाष पवार, श्रीपाद परोपकारी, नीलेश माईनकर, सीताराम कोल्हे, कमलाकर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, संजय बेडवाल, उपनिरीक्षक राजकुमार तडवी, अन्सार शेख, राकेश शेवाळे, मिथुन म्हात्रे, पोलीस हवालदार शांताराम शेळके, संजय जाधव, विजय शिंपी, प्रशांत नागरे, कैलास निंबेकर आदी शेकडो पोलीस सेवक व पोलीस मित्र सहभागी झाले होते. या संचलनात नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टी करून पोलिसांविषयी आदर व्यक्त करून आभार मानले.
पोलीसही भारावले
डीजीपीनगर माउली लॉन्स येथून सुरू झालेले हे संचलन खुटवडनगर, त्रिमूर्ती चौक, सावतानगर, पवननगर, महाकाली चौक, दत्त चौक, घुगे मळा, राणा प्रताप चौक, पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आले होते. नागरिकांकडून मिळालेले प्रेम आणि आदर यामुळे पोलीस देखील भारावून गेले होते.

Web Title: Cidco residents showered flowers on the police during the operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.