सिडकोत विक्रेत्यांचा जागेवर बसण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:14 AM2021-05-15T04:14:14+5:302021-05-15T04:14:14+5:30
भाजी व फळविक्रेत्यांना सकाळी १२ वाजेपर्यंत मनपाने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय करण्यासाठी मुभा दिली आहे. भाजी व फळविक्रेते ...
भाजी व फळविक्रेत्यांना सकाळी १२ वाजेपर्यंत मनपाने ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय करण्यासाठी मुभा दिली आहे. भाजी व फळविक्रेते हे एक दिवस मनपाने मार्किंग केलेल्या जागेवर व्यवसाय करण्यासाठी बसले होते; परंतु पोलिसांच्या दंडुकेशाहीला घाबरत नागरिक घराबाहेर न पडल्याने रस्त्यालगत मनपाने ठरवून दिलेल्या जागेवर बसणाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे भाजीविक्रेत्यांनी हातगाड्यांवर गल्लीबोळांत जाऊन व्यवसाय सुरू केला.
कोट==
महापालिकेने भाजी व फळविक्रेत्यांना सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत मार्किंग करून दिलेल्या जागेत रस्त्यालगत व्यवसाय करण्यासाठी मुभा दिली आहे; परंतु गुरुवारी बहुतांशी विक्रेत्यांनी गुरुवारी मार्किंग करून दिलेल्या जागेवर व्यवसाय न करता गल्लीबोळांत घरोघरी हातगाडीवर व्यवसाय करणे पसंत केले.
-दशरथ भवर,
प्रभारी अधीक्षक, मनपा सिडको विभाग