सिडकोचा प्रभाग जोडला पश्चिम विभागाला
By admin | Published: January 24, 2017 12:51 AM2017-01-24T00:51:02+5:302017-01-24T00:51:18+5:30
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली सूत्रे हाती
सिडको : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आज सिडको प्रभागासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. सिडकोतील सहा प्रभागांपैकी प्रभाग २४ हा नाािशक पश्चिम विभागाला जोडला गेला असल्याने येथील इच्छुकांची चांगलीच धावपळ होणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात होऊ घेतलेल्या मनपा निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, येत्या २७ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. सिडको प्रभागात प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८, २९ असे सहा प्रभागांचा समावेश आहे. परंतु मनपाने यातील प्रभाग क्रमांक २४ हा सिडको प्रभागातून वगळून तो मनपाचा पंडितनगर येथील नाशिक पश्चिम विभागात समाविष्ट केला आहे. यामुळे सिडकोतील प्रभाग २४ मधील इच्छुक असलेल्या सर्वांसाठी हे त्रासदायक ठरणार असल्याचे दिसत आहे. तसेच २४ प्रभाग वगळून यात इंदिरानगर भागातील प्रभाग ३१चा सिडको प्रभागात समावेश केला आहे. सिडकोतील प्रभाग क्र मांक २५, २६ व २८ साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मनपाच्या धुळे विभागाचे उपायुक्त रवींद्र जाधव, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरचे राहुल जाधव तसेच मनपा सिडको विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी सूत्रे हाती घेतली आहे, तर प्रभाग क्रमांक २७, २९ व ३१ या प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हा उपनिबंधक एन. डी. करे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळ्याचे तहसीलदार अनिल गावित, मनपा उपायुक्त संजीव बच्छाव, बी. वाय. मालावाल यांनी सूत्रे हाती घेतील आहे. (वार्ताहर)