सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:38 AM2019-07-02T00:38:49+5:302019-07-02T00:39:07+5:30
सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून, गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत.
सिडको : सिडको प्रभागावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून, गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. यामुळे सलग तिसऱ्या वर्षीही सिडको प्रभागावर प्रभाग सभापती होण्याचा मान हा सेनेच्याच उमेदवाराला मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
सिडको प्रभाग सभापतिपदासाठी मागील वर्षीप्रमाणेच यंदाही इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्या दोन वर्षांत ज्यांना सेनेकडून विविध पदे देण्यात आली आहे अशांना डावलून इतर इच्छुकांना संधी देण्यात येणार असल्याचे समजते. येत्या शुक्रवारी (दि.५) सकाळी ११ वाजता प्रभाग सभापतिपदाची निवडणूक होणार आहे.
सिडको प्रभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८, २९ व ३१चा समावेश करण्यात आला आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेच्या कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, प्रवीण तिदमे, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर, सुवर्णा मटाले, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव आदींचा समावेश आहे. यंदा शिवसेना व भाजपाची युती झाली असून, भाजपाच्या नगरसेवकांमध्ये भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, कावेरी घुगे, प्रतिभा पवार, मुकेश शहाणे, नितीन ठाकरे, छाया देवांग, भगवान दोंदे, संगीता आव्हाड आदींचा, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेना १४, भाजपा नऊ व राष्टÑवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (चौदा) पाठोपाठ भाजपा (नऊ) दुसºया क्रमांकाचा पक्ष असून, सेना व भाजपाची युती झाल्याने विरोधकांमध्ये राजेंद्र महाले हे एकमेव नगरसेवक उरले आहे. सेनेचे नगरसेवक दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, महिला नगरसेवक किरण गामणे (दराडे), कल्पना चुंभळे आदींनी सभापतिपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. एकूणच सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे.
असे आहे पक्षीय बलाबल
सिडको प्रभागात सहा प्रभाग मिळून २४ नगरसेवक आहेत. शिवसेना व भाजपाची युती झाली असून, २४ पैकी सेना-१४ व भाजपा-०९ असे युतीचे २३ नगरसेवक आहेत. विरोधी गटामध्ये राष्ट्रवादीचे एकमेव राजेंद्र महाले हे नगरसेवक आहे.
४सेनेने पहिल्या वर्षी सभापती म्हणून डेमसे यांना, तर दुसºया वर्षी हर्षा बडगुजर यांना सभापतिपद दिले असून, यंदा कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले़