सिडकोत नगरसेवकाचे कृत्य : चार तासांनंतर सुटका मनपाच्या अधिकाऱ्यांना डांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:44 AM2019-11-05T01:44:21+5:302019-11-05T01:44:37+5:30
सिडको : नाशिक शहरातील एलईडी बसविण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सिडकोत उमटले असून, प्रभाग २९ मधील विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवित नसल्याचा राग आल्याने भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट विद्युत विभागाच्या दालनाला कुलूप ठोकून अधिकाºयाना डांबून ठेवले.
सिडको : नाशिक शहरातील एलईडी बसविण्यावरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद सिडकोत उमटले असून, प्रभाग २९ मधील विद्युत समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही समस्या सोडवित नसल्याचा राग आल्याने भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट विद्युत विभागाच्या दालनाला कुलूप ठोकून अधिकाºयाना डांबून ठेवले. सुमारे चार तास अधिकाºयांना कोंडून ठेवल्यानंतर वरिष्ठ अधिकाºयांच्या मध्यस्थीने दोन दिवसांत प्रभागातील समस्येचा सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अधिकाºयांना सोडण्यात आले.
दरम्यान, चार तासांहून अधिक वेळ विद्युत विभागाच्या अधिकाºयांना कोंडून ठेवले असताना विभागीय अधिकाºयासह अन्य अधिकाºयांनी या साºया प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिडकोतील प्रभाग २९ मधील अनेक पथदीप बंद असून, बºयाच ठिकाणी पथदीपच उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रभागातील मुख्य रस्त्यांसह अनेक चौकांमध्ये अंधाराचे साम्राज्य आहे.
याबाबत नगरसेवक शहाणे यांनी विद्युत विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी नवीन पथदीप उभारण्याबरोबरच नादुरुस्त पथदीपांची दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक शहाणे यांच्याकडून केली जात होती. याबाबत अनेकदा विद्युत विभागाला तोंडी व लेखी तक्रारी करूनही अधिकारी लक्ष देत नसल्याने सोमवारी नगरसेवक शहाणे यांचेसह शिवाजी अहिरे, पाटील, आनंद मिस्तरी, वसंत क्षत्रिय, अजय वडनेरे, राहुल वरखेडे, स्वप्नील भामरे, प्रदीप चव्हाण, राजू धात्रक, किशोर सोनवणे, स्वप्नील पांगे, भगवान बरके आदी नागरिकांनी सिडको विभागीय कार्यालय गाठून विद्युत विभागाचे कार्यालय गाठले. यावेळी विद्युत विभागाचे उपअभियंता बाबूलाल बागुल, वायरमन शिवसिंग देवरे, राजेंद्र सपकाळ, नामदेव शिवदे, राजेंद्र पगारे आदी कर्मचारी कार्यालयातच उपस्थित होते. शहाणे यांनी सुरुवातीला अधिकाºयांशी चर्चा करून प्रभागातील समस्यांबाबत माहिती दिली.
मात्र अधिकाºयांकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे लक्षात येताच नगरसेवक शहाणे यांनी अधिकारी कार्यालयात बसलेले असतानाच कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत कुलूप उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर तब्बल चार तासांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता डी. बी. वनमाळी व अनिल गायकवाड यांनी सिडको कार्यालयात येऊन नगरसेवक शहाणे यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी प्रभाग २९ मधील बंद पथदीप व अन्य समस्यांची यादी तयारी करून तीन दिवसांत हे कामे सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.