सिडकोत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:29 AM2018-07-01T01:29:51+5:302018-07-01T01:30:05+5:30
येथील वावरेनगरमध्ये संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीकडून अंबड पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ राम अंजोर त्रिपाठी (४०, रा़ सातपूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही कट्टे व काडतुसे मिळण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केली आहे़
सिडको : येथील वावरेनगरमध्ये संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तीकडून अंबड पोलिसांनी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत़ राम अंजोर त्रिपाठी (४०, रा़ सातपूर) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून आणखी काही कट्टे व काडतुसे मिळण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केली आहे़
तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि़२९) सायंकाळच्या सुमारास वावरेनगरमध्ये एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे हेमंत आहेर व दिपक वाणी यांचे पथक पाठवून संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो सातपूर परिसरातील रहिवासी राम त्रिपाठी असल्याचे समोर आले़ त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात त्रिपाठीविरोधात भारतीय हत्यार कायदा व मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, पोलीस हवालदार भास्कर मल्ले, पोलीस नाईक दत्तात्रय गवारे, दुष्यांत जोपाळे, विजय वरंदळ, अविनाश देवरे, हेमंत अहेर, पोलीस शिपाई दीपक वाणी, पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, प्रशांत नागरे यांनी ही कामगिरी केली़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.