आज सिडकोत पाणी बंद

By admin | Published: February 21, 2016 11:37 PM2016-02-21T23:37:55+5:302016-02-21T23:47:37+5:30

विभागवार एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Cidcoat water closure today | आज सिडकोत पाणी बंद

आज सिडकोत पाणी बंद

Next

नाशिक : भविष्यातील जलसंकट लक्षात घेता महापालिका प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस विभागवार पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानुसार सोमवार दि. २२ पासून सिडको आणि नाशिक पूर्व भागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोत रविवारी पाणीसाठ्याची लगबग सुरू होती. महिलावर्गाने घरातील छोटेमोठी भांडीही पाण्याने भरून ठेवली.
गंगापूर धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची वस्तुस्थिती पाहता मनपा आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाणीकपातीसंबंधीचे वेळापत्रक जाहीर करत विभागवार पाणी बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून करण्यात येणार आहे. सोमवारी सिडकोतील जलशुद्धीकरण केंद्र, बारा बंगला, पवननगर पंप, चेतनानगर जलशुद्धीकरण केंद्र येथून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभाग ४१ ते ४९ आणि संपूर्ण परिसर तसेच प्रभाग ५१ आणि ५२ मध्ये पाणीपुरवठा एक दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Web Title: Cidcoat water closure today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.