सिडकोच्या बांधकाम परवानगीचा अडसर हटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:48 AM2018-12-30T00:48:38+5:302018-12-30T00:48:56+5:30

सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे.

 CIDCO's construction permission will be removed | सिडकोच्या बांधकाम परवानगीचा अडसर हटणार

सिडकोच्या बांधकाम परवानगीचा अडसर हटणार

Next

नाशिक : सिडकोमधील बांधकाम परवानगीचा अडसर आता दूर होणार आहे. गेल्या महासभेतील लक्षवेधीनुसार नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार नगररचना विभागाकडून शासनाचे लक्ष प्रस्ताव पाठवून वेधण्यात आले आहे.
आॅटोडीसीआर सॉफ्टवेअर प्रणालीमध्ये सिडकोमधील बांधकाम नियमावलीचा समाविष्ट नसल्याने आॅनलाइन बांधकाम परवानगी प्रक्रियेत सिडकोमधील बांधकामाचे परवानगी अर्ज स्वीकारले जात नव्हते. त्यामुळे सिडको परिसरातील बांधकाम व्यवसाय ठप्प झाला होता. बांधकामाच्या परवानगी अर्ज प्रक्रिया आॅटोडीसीआरद्वारे आॅनलाइन पार पडत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. शेकडो फाईली परवानगीच्या प्रतीक्षेत नगररचना विभागाकडे पडून आहेत. महासभेत लोकप्रतिनिधींनी याबाबत मागणी केली होती. तसेच दिलीप दातीर यांनी लक्षवेधीही मांडली होती. यानुसार शासनाचे मार्गदर्शन याबाबत घेण्यासाठी नगररचना विभागाने शहर व सिडकोची नियमावली वेगवेगळी असल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बांधकाम विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली व प्रणाली वेगवेगळी असल्यामुळे सिडकोचा आॅटोडीसीआरमध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. नागरिकांनी याबाबत बांधकाम परवानगीचे अर्ज प्रकरण आॅनलाइनऐवजी आॅफलाइन स्वीकारण्यात यावे. या मागणीनुसार शासनाकडे मनपाच्या नगररचना विभागाने प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे बांधकाम परवानगीचा प्रश्न सुटणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
तांत्रिक अडचण सुटणार
आॅटोडीसीआरनुसारच परवानगी अर्ज घ्यावेत, असे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितल्यामुळे आणि आॅटोडीसीआर प्रणालीमध्ये सिडकोचा समावेश नसल्यामुळे या तांत्रिक अडचणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. बांधकाम परवानगी अर्ज प्रक्रिया सिडकोच्या बाबतीत ठप्प झाली आहे; मात्र लवकरच याबाबतचा आदेश शासनाकडून प्राप्त होणार आहे.

Web Title:  CIDCO's construction permission will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.