सिडकोत घरात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:07 AM2019-07-02T01:07:38+5:302019-07-02T01:07:54+5:30
परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले, तसेच पवननगर, कर्मयोगीनगर भागात ड्रेनेजची लाइन चोकअप झाल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.
सिडको : परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले, तसेच पवननगर, कर्मयोगीनगर भागात ड्रेनेजची लाइन चोकअप झाल्याने घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले.
सिडकोसह परिसरात काल सोमवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक भागात तसेच रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले होते. जुने सिडको येथील लेखानगर वसाहतीत तसेच कर्मयोगीनगर भागात पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्याने त्यांचे हाल झाले. पवननगर भागात जोरदार पावसामुळे ड्रेनेज लाइन तुंबल्याने घरांमध्ये पाणी शिरले. मनपाची यंत्रणा नसल्याने तक्र ार करून कुणीही न आल्याने नागरिकांना बराच वेळ घरातील पाणी बाहेर फेकावे लागले. उत्तमनगर परिसरात बुद्धविहार, जुने सिडकोतील सपना थिएटर परिसर, कामटवाडे, महाराणा प्रताप चौक भागातील बाजीप्रभू चौक, दत्त चौक या भागातील खोलगट रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. पाणी साचलेल्या रस्त्यावरून नागरिक तसेच दुचाकी वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागली. पाणी साचलेल्या ठिकाणी निचरा करण्याची मागणी होत आहे.