सिडकोत उधळले कोरडे रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:57 PM2019-03-26T23:57:38+5:302019-03-27T00:10:34+5:30
दरवर्षीप्रमाणे सिडको परिसरात मोठ्या उत्सहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षी बहुतांशी मंडळांच्या वतीने तसेच नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता कोरडा रंग लावला.
सिडको : दरवर्षीप्रमाणे सिडको परिसरात मोठ्या उत्सहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यंदाच्या वर्षी बहुतांशी मंडळांच्या वतीने तसेच नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता कोरडा रंग लावला. यावेळी सिडको व अंबड भागातील गल्ली-बोळात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यात महिला व बालगोपाळांचा सहभाग विशेष जाणवला.
सिडको व अंबड भागात यंदाच्या वर्षीही रंगपंचमी मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळपासून लहान मुलांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. विशेष म्हणजे यावेळी महिला वर्गाचा सहभाग अधिक जाणवला. बहुतांशी ठिंकाणी पाण्याचा वापर न करता पारंपरिक कलरचा वापर करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. जुने सिडकोतील तुळजा भवानी चौक, विजयनगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, हनुमान चौक, गणेश चौक सार्वजनिक मंडळाच्या वतीने डीजेचा वापर न करता इतर वाद्य वाजवून रंगपंचमीत सहभाग घेतला.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही हनुमान चौकातील सखी महिला मंडळाने कोरडी रंगपंचमी साजरी केली. यात परिसरातील महिला तसेच लहान मुलांनी गर्दी केली होती.