नाशिकच्या सिडको भागात नागरी वस्तीत कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:55 AM2018-08-08T10:55:21+5:302018-08-08T11:02:06+5:30
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
नाशिक/सिडको: महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या घरातील तसेच व्यावसायिक व भाजीबाजारातील कचरा गोळा करण्यासाठी ठेकेदारामार्र्फत घंटागाडीची व्यवस्था केली आहे. परंतु सिडको भागात मनपा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व संबंधित ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. रिमझिम पावसामुळे या कचºयाच्या ढिगाºयात पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने नागरिकांना रस्त्याने जाताना त्रास होत असून, आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनपाच्या कर्तव्यदक्ष आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याची अपेक्षा सिडकोवासीयांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात डेंग्यूसदृश रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच आरोग्य विभागाच्या कामचुकारपणामुळे येथील मुख्य चौक तसेच भाजीबाजार परिसरात कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे आरोग्य विभागाचे सफाई कर्मचारी साफसफाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नागरीवस्तीतही ठिकठिकाणी घाण साचलेली दिसून येत असून यामुळे सिडको भागात साथीचे रोग अतिशय तीव्र स्वरूपात पसरत आहे. यातच डासांचे प्रमाणही वाढले असताना संबंधित विभागाकडून धूर व औषध फवारणी केली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या डेंग्यूसदृश, चिकुनगुण्या आजारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले असताना आरोग्य विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे व घंटागाडी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कचरा व्यवस्थित उचलला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळाले. मंगळवारी जुने सिडको भागातील भाजीबाजार परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कचरा उचलला नसल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत नागरिकांनी प्रभागाचे नगरसेवक कल्पना पांडे व माजी नगरसेवक चंद्रकांत पांडे यांना कळविले. पांडे यांनी तत्काळ कचरा असलेल्या भागात जाऊन पाहणी करीत संबंधित मनपा कर्मचाºयांना जाब विचारला. अधिकाºयांनी तत्काळ घंटागाडी बोलावून साचलेला कचरा उचलल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.