कोथिंबीर १३० रुपये जुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 11:04 PM2020-08-08T23:04:28+5:302020-08-09T00:20:17+5:30
पंचवटी : येत्या दोन-तीन दिवसांवर गोकुळाष्टमी असल्याने गुजरात राज्यातून कोथिंबिरीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून, मागणी वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहेत.
Next
पंचवटी : येत्या दोन-तीन दिवसांवर गोकुळाष्टमी असल्याने गुजरात राज्यातून कोथिंबिरीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली असून, मागणी वाढल्याने कोथिंबीरचे बाजारभाव तेजीत आले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (दि.८) सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर १३ हजार रुपये शेकडा म्हणजेच १३० रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याची माहिती बाजार समितीतील व्यापारी नितीन लासुरे यांनी दिली. गेल्या आठवड्यात कोथिंबीर आवक घटल्याने बाजारभाव १२० रुपये प्रति जुडीवर आले होते. चार दिवसांपूर्वी कोथिंबीरला १० ते २० रुपये जुडी भाव मिळाला होता. पावसाचा कोथिंबीरीवर परिणाम झालेला नाही.