एचपीटी महाविद्यालयात सिनेस्टाइल हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:40 AM2017-12-23T00:40:12+5:302017-12-23T00:40:12+5:30
एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौतमनगर, अंबड) व राहुल रमेश चव्हाण (१८, रा़ बेथेलनगर, शरणपूररोड, नाशिक) अशी जखमींची नावे आहेत़ या घटनेमुळे महाविद्यालय परिसर व कॉलेजरोडवर सुरू असलेली गुंडागर्दी समोर आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दासमोर आला आहे़
नाशिक : एचपीटी महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत शुक्रवारी (दि़२२) दुपारी झालेल्या सिनेस्टाइल हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ प्रशांत सुंदर खरात (२६, राग़रवारे, गौतमनगर, अंबड) व राहुल रमेश चव्हाण (१८, रा़ बेथेलनगर, शरणपूररोड, नाशिक) अशी जखमींची नावे आहेत़ या घटनेमुळे महाविद्यालय परिसर व कॉलेजरोडवर सुरू असलेली गुंडागर्दी समोर आली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दासमोर आला आहे़ गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळत असताना बॉल मागण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद सुरू झाले़ या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर महाविद्यालयातील काही बाउन्सर्सने मध्यस्थी करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला़ या दोन्ही गटांना महाविद्यालय प्रशासनासमोर उभे केल्यानंतर समज देण्यात येऊन बाहेर काढले़ यानंतर दोन्ही गटांनी बाहेरच्या टवाळखोरांना बोलावून महाविद्यालय आवारामध्ये दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली़
महाविद्यालय आवारात सुरू असलेल्या या वादामध्ये एकही गट माघार घेण्यास तयार नसल्याने बाउन्सर्सने महाविद्यालयाचे सर्व प्रवेशद्वार बंद केले, तर या कालावधीत वादाचे रूपांतर हाणामारीत झाले़ या हाणामारीत टवाळखोरांनी एका तरुणाच्या अंगावर सायकल फेकून जखमी केले़ यानंतर पुन्हा दोन्ही गटांनी एकमेकांवर क्रिकेट बॅट व शस्त्रास्त्राचा वापर करून हाणामारी सुरुवात केली़ यामध्ये प्रशांत खरात या तरुणाच्या डोक्यात बॅट मारल्याने तो गंभीर जखमी झाला, तर दुसºया अन्य घटनेत राहुल चव्हाण हाही जखमी झाला़ या दोघांवरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
विद्यार्थ्यांमध्ये दहशत
सुमारे दोन-अडीच तास महाविद्यालयात सुरू असलेला राडा मिटविण्यासाठी बाउन्सर्सने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावर हात उगारला गेला़ गत दोन वर्षांपासून कॉलेजरोड परिसरात धारदार शस्त्रांचा वापर, प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या असून, विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे़