परिमंडळ-२ : अवैध दारूविक्री, जुगार अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 05:18 PM2019-07-21T17:18:42+5:302019-07-21T17:41:19+5:30

तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांमध्ये सुरू आहे.

Circle-2: Police raid on illegal liquor shops, gambling bases | परिमंडळ-२ : अवैध दारूविक्री, जुगार अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र

परिमंडळ-२ : अवैध दारूविक्री, जुगार अड्डयांवर पोलिसांचे धाडसत्र

Next
ठळक मुद्देदेवळाली कॅम्प पोलिसांनी जुगार खेळणार्या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा

नाशिक : शहर आयुक्तालयाच्या परिमंडळ २ मध्ये अवैध धंदे पोलीसांच्या रडारवर आले असून अचानक तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र या धाडसत्रामध्ये मोठे मासे गळाला लागले नसल्याचीही चर्चा त्या-त्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नागरिकांमध्ये सुरू आहे.
पोलीस आयुक्तालय परिमंडळ दोन हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना अवैध दारूविक्र ी व जुगार अड्डयांवर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.२०) सातपूर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर व नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी अवैध दारूविक्र ी व जुगार अड्डयांवर छापेमारी केली. इंदिरानगर पोलिसांना जुगार अड्डयांवर छापा टाकत तीनजणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ९३० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित रामचंद्र पुंडलिक गावीत (२७, रा.वडाळा), निसार मोहम्मद शाह (५०, रा.वडाळा), कुंदन खंडू जाधव (३७, रा. भारतनगर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नाशिकरोड पोलिसांनी अवैध दारूविक्र ी करणारे नाना दामू अहिरे (५२, रा.देवळाली गांव) याला अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे.
सातपूर पोलिसांनी अवैध दारूच्या अड्डयावर छापा टाकत संशयित आरोपी अनिल रामदास चव्हाण (रा.सातपूर) याच्यावर गुन्हा दाखल केला. त्याच्याकडून ८८४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जुगार अड्डयावर छापा टाकत जुगार खेळणाऱ्या लक्ष्मण शालीक भंगाळे (४८, रा.सातपूर), राजेंद्र अशोक गांगुर्डे (२८,रा.सातपूर), विलास भिला हटक (३८, रा आनंदवल्ली) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला अहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी जुगार खेळणार्या तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून १ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. राजेश वसंत पवार (४४, रा.भगूर), सुनील घनशाम जाधव (५०, रा.जेलरोड), ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड (६८, रा.भगूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

लहान मासे गळाला
परिमंडळ-२मधील नाशिकरोड, उपनगर, इंदिरानगर, सातपूर, अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारूविक्री, जुगार अड्डयांची कमी नाही; पोलिसांनी अचानकपणे धाडसत्र सुरू केले असले तरी या धाडसत्राच्या प्रारंभी केवळ लहान मासे गळाला लागल्याचे दिसते. मोठे जुगार, क्लब, दारू धंदेचालकांना या कारवाईतून अभय दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Circle-2: Police raid on illegal liquor shops, gambling bases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.